Vijay Mallya: विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नात ललित मोदीची हजेरी; फरार आरोपींचा फोटो व्हायरल

Vijay Mallya Son Sidhartha Mallya wedding: विजय मल्ल्या यांनी आपल्या मुलाचे लग्न ब्रिटनमधील आलिशान इस्टेटमध्ये मोठ्या थाटामाटात आयोजित केले होते. विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याने जस्मिनसोबत लग्नगाठ बांधली आहे.
Vijay Mallya Son Sidhartha Mallya wedding
Vijay Mallya Son Sidhartha Mallya weddingSakal
Updated on

Vijay Mallya Son Sidhartha Mallya wedding: फसवणूक करून देश सोडून पळून गेलेले दोन व्यावसायिक ब्रिटनमध्ये एकत्र आले होते. माजी मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो विजय मल्ल्या यांच्या मुलाच्या लग्नातील आहेत, ज्यात ललित मोदीही उपस्थित होते.

विजय मल्ल्या यांनी आपल्या मुलाचे लग्न ब्रिटनमधील आलिशान इस्टेटमध्ये मोठ्या थाटामाटात आयोजित केले होते. विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याने जस्मिनसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी आधी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले.

ललित मोदींचे फोटो समोर आले

या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये विजय मल्ल्या आपला मुलगा सिद्धार्थला किस करताना दिसत आहे. लग्नातील पाहुणेही चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, या फोटोंमध्ये ललित मोदींचा फोटोही ट्रेंड होऊ लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ललित मोदींनी केवळ लग्नसोहळ्यात सहभाग घेतला नाही तर वधू-वरांना आशीर्वादही दिले. विजय मल्ल्या यांनीही आपल्या मुलाच्या लग्नात जोरदार डान्स केला.

Lalit Modi Spotted At Vijay Mallya's Son Sidhartha's Wedding
Lalit Modi Spotted At Vijay Mallya's Son Sidhartha's WeddingSakal

दोघांवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप आहे

किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांच्यावर 900 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. तेव्हापासून विजय मल्ल्या देशातून फरार आहे. ललित मोदींवर 753 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ललित मोदी यांची IPL गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

ललित मोदीने वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपच्या (डब्ल्यूएसजी) अधिकाऱ्यांशी संगनमत करून 753 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा बीसीसीआयचा आरोप आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने 2010 मध्ये ललित मोदीला निलंबित केले. तेव्हापासून ललित मोदी देशातून फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.