China Import: चीनमधून लॅपटॉप, टॅबलेटची आयात 47 टक्क्यांनी वाढली; मार्चमध्ये 273.6 दशलक्ष डॉलर किमतीची उत्पादने केली ऑर्डर

China Import: प्रमुख इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादनांची आयाती सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांनंतर, चीनमधून लॅपटॉप आणि टॅब्लेटसह कॉम्प्युटरची आवक 47.1 टक्क्यांनी वाढली आहे. ही उत्पादने 273.6 दशलक्ष डॉलर किमतीची आहेत.
Laptop, tablet imports from China surged 47 percent to 273-6 million dollar in March
Laptop, tablet imports from China surged 47 percent to 273-6 million dollar in March Sakal
Updated on

China Import: प्रमुख इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादनांची आयात सुरू झाल्यानंतर पाच महिन्यानंतर, चीनमधून लॅपटॉप आणि टॅब्लेटसह कॉम्प्युटरची आवक 47.1 टक्क्यांनी वाढली आहे. ही उत्पादने 273.6 दशलक्ष डॉलर किमतीची आहेत.

मार्चमध्ये, सिंगापूरमधून कॉम्प्युटरची आयात 63.9 टक्क्यांनी घसरून 12.2 दशलक्ष डॉलर झाली, परंतु हाँगकाँगमधून आयात 39.1 टक्क्यांनी वाढून 33.6 दशलक्ष डॉलर झाली. तैवानमधून आयात 61.3 टक्क्यांनी वाढली आणि तेथून 82.1 दशलक्ष डॉलर्सचा माल आयात करण्यात आला.

सरकारने इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर वस्तूंच्या आयातीसाठी ऑनलाइन देखरेख प्रणाली सुरू केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये चीनमधून आयात 14 टक्क्यांनी घसरली आणि एकूण आयात 17.2 टक्क्यांनी घसरली. या मार्चमध्ये या मालाच्या एकूण आवकमध्ये चीनचा वाटा 81.6 टक्के होता. आर्थिक वर्ष 2024 साठी हा आकडा 77.7 टक्के होता.

Laptop, tablet imports from China surged 47 percent to 273-6 million dollar in March
SBI Chairman Interview: SBI चेअरमन पदाची मुलाखत अचानक रद्द, काय आहे प्रकरण?

चीनमधून आयात का वाढली?

गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर श्रेणीतील उत्पादने जसे की लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर आणि सर्व्हर यांच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर, या उपकरणांची आयात अचानक वाढली कारण आयातदार आणि व्यापाऱ्यांना असे वाटले की या निर्णया नंतर आयातीसाठी परवाना आवश्यक असेल. त्यांची आयात सप्टेंबरमध्ये 41.8 टक्के आणि ऑक्टोबरमध्ये 29.7 टक्क्यांनी वाढली होती.

आयातीसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करणे हा सरकारच्या निर्णया मागचा उद्देश असला, तरी उद्योगांनी त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली होती, त्यामुळे ही योजना 1 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

Laptop, tablet imports from China surged 47 percent to 273-6 million dollar in March
SEBI: शेअर बाजारातील अफवा थांबवण्यासाठी सेबीने जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम

आणखी एक पाऊल उचलत सरकारने जाहीर केले की ते कोणत्याही क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालणार नाहीत. पण नवीन कॉन्टॅक्टलेस इम्पोर्ट ऑथोरायझेशन सिस्टीम लाँच करण्याचीही घोषणा केली. आता आयात निरीक्षण प्रणालीच्या स्थापनेमुळे, सरकार विविध स्त्रोतांकडून उत्पादनाची विशिष्ट माहिती गोळा करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com