करविवरणपत्र भरण्याची अंतिम संधी

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचे (आकारणी वर्ष २०२४-२५) प्राप्तिकर विवरणपत्र भरायचे राहिले असेल, (ज्या प्राप्तिकरदात्यांना लेखापरिक्षण करण्याची गरज नाही), तर अद्यापही अशा करदात्यांसाठी विलंब शुल्क भरून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची एक शेवटची संधी उपलब्ध आहे.
करविवरणपत्र भरण्याची अंतिम संधी
करविवरणपत्र भरण्याची अंतिम संधी sakal
Updated on

करकायदा

अॅड.सुकृत देव,करसल्लागार

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचे (आकारणी वर्ष २०२४-२५) प्राप्तिकर विवरणपत्र भरायचे राहिले असेल, (ज्या प्राप्तिकरदात्यांना लेखापरिक्षण करण्याची गरज नाही), तर अद्यापही अशा करदात्यांसाठी विलंब शुल्क भरून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची एक शेवटची संधी उपलब्ध आहे. वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या करदात्यांसाठी एक हजार रुपये आणि पाच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी पाच हजार रुपये विलंब शुल्क भरून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत विवरणपत्र दाखल करण्याची संधी आहे. आधी दाखल केलेल्या विवरणपत्रात चूक झाली असल्यास कलम १३९(५) नुसार सुधारित विवरणपत्र दाखल करता येते. त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. त्यामुळे ज्यांचे विवरणपत्र दाखल करायचे राहिले असेल, त्यांनी विलंब शुल्क भरून तातडीने विवरणपत्र दाखल करावे. त्याचा त्यांना लाभच होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.