Income Tax Return: पहिल्यांदाच रिटर्न फाइल करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

Income Tax Return 2024: इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return Filing 2024) भरण्याची वेळ आली आहे. सर्व करदात्यांना 31 जुलै 2024 पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागेल. अनेकदा आयटीआर भरताना आपण त्याच्याशी संबंधित कागदपत्रे शोधतो.
Income Tax Return 2024
Income Tax Return 2024Sakal

Income Tax Return 2024: इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return Filing 2024) भरण्याची वेळ आली आहे. सर्व करदात्यांना 31 जुलै 2024 पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागेल. अनेकदा आयटीआर भरताना आपण त्याच्याशी संबंधित कागदपत्रे शोधतो. अशा परिस्थितीत वेळ वाया जातो आणि अनेक समस्या निर्माण होतात.

वेळेची बचत करण्यासाठी आणि त्रास टाळण्यासाठी करदात्यांनी आयटीआर भरण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेवावीत. यामुळे रिटर्न भरण्याची प्रक्रिया खूप सोपी होईल आणि ITR भरताना कोणतीही अडचण येणार नाही.

करदात्याने एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे की त्याने सर्व माहिती आयटीआरमध्ये अचूक भरली पाहिजे. कोणतीही चूक झाल्यास आयकर विभागाकडून आयटीआर नाकारला जातो. आयकर रिटर्न भरताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजी ते जाणून घेऊ.

एकूण करपात्र उत्पन्न

पगारासह सर्व स्रोतांमधून तुम्ही कमावलेले एकूण उत्पन्न, आयकर कायद्यांतर्गत मानक वजावट आणि भविष्य निर्वाह निधी अंर्तगत कपात केलेल्या रकमेद्वारे कमी केले जाते. तुमच्या काही गुंतवणुकीही एकूण उत्पन्नातून वजा केल्या जातात. त्यानंतर उरलेले उत्पन्न हे करपात्र उत्पन्न असते.

आयकर प्रणाली

भारतात सध्या दोन आयकर प्रणाली आहेत: जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली. 2020 मध्ये नवीन प्रणाली आणली, ज्यामध्ये आयकर दर वेगळे आहेत आणि सूट दर देखील वेगळे आहेत. परंतु यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वजावट आणि सूट उपलब्ध नाहीत.

रिटर्न भरताना तुम्हाला कोणती प्रणाली निवडायची आहे हे तुम्ही सांगितले नाही, तर नवीन प्रणालीत तुमची निवड केली जाईल. म्हणून, प्रथम दोन्ही प्रणालींचे फायदे आणि तोटे समजून घ्या आणि नंतर त्यापैकी एक कर प्रणाली निवडा.

आवश्यक कागदपत्रे

तुम्ही रिटर्न भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी सर्व आवश्यक आर्थिक कागदपत्रे तुमच्याकडे ठेवा. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कार्यालयातून मिळालेला फॉर्म 16 सर्वात महत्त्वाचा आहे.

यानंतर, तुमच्याकडे तुमचे बँक स्टेटमेंट असले पाहिजे, तुमच्याकडे कर वाचवण्याच्या उद्देशाने जी काही गुंतवणूक केली आहे त्याचा पुरावाही हवा. तुम्ही भाडे भत्ता (HRA) वर सूट मिळण्याचा दावा करत असल्यास, भाडे पावती ठेवा. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर व्याज वजावटीसाठी कर्ज विवरणपत्र आवश्यक आहे. तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे.

फॉर्म 26AS तपासा

तुमच्या संपूर्ण उत्पन्नाचा संपूर्ण तपशील आणि त्यावर कापलेला TDS फॉर्म 26AS मध्ये दिलेला आहे. कर आणि रिटर्न अचूकपणे भरण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

वार्षिक विवरण अहवाल (Annual Information Statement) 

यात व्याज, लाभांश, शेअर डीलमधून मिळणारे उत्पन्न आणि परदेशातून मिळालेले पैसे यांचा संपूर्ण तपशील असतो. हे सर्व तुमच्या रिटर्नमध्ये आधीच भरलेले असते.

योग्य आयटीआर फॉर्म निवडा

आयकर विभाग दरवर्षी वेगवेगळ्या श्रेणीतील करदात्यांना वेगवेगळे रिटर्न फॉर्म जारी करतो. योग्य फॉर्मची निवड करावी.

Income Tax Return 2024
Vehicle Sales: सवलत आणि भेटवस्तूंच्या माध्यमातून वाहन कंपन्यांची विक्री; कोणत्या वाहनावर किती सूट मिळतेय?

योग्य कपातीचा दावा करणे

आयकर कायद्याच्या कलम 80C (रु. 1.5 लाखांपर्यंतची वजावट), 80D (आरोग्य विमा), 80TTA (देणगी) अंतर्गत वजावटी तुमचे करपात्र उत्पन्न कमी करतात आणि तुमचे कर दायित्व देखील कमी करतात. म्हणून, रिटर्न भरताना, सर्व प्रकारच्या वजावट आणि सवलतींचा दावा करा.

विवरणपत्र वेळेवर भरा

जर आयकर विवरणपत्र वेळेपूर्वी भरले नाही तर तुम्हाला दंड आणि व्याज भरावे लागेल. रिटर्न भरण्याची अंतिम तारीख साधारणपणे 31 जुलै असते. तरीही, तारीख बदलली आहे किंवा वाढवली आहे का हे पाहण्यासाठी आयकर विभागाची वेबसाइट तपासा.

ई-फायलिंग फायदेशीर

आयकर विभाग स्वतःच्या पोर्टलद्वारे ई-फायलिंगला प्रोत्साहन देत आहे. आयकर विभागाचे पोर्टल सोयीस्कर आहे आणि चुकाही कमी होतात. प्रथमच रिटर्न भरत असताना, तुम्ही पोर्टलवर तुमचे खाते उघडा आणि नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून रिटर्न सबमिट करू शकता.

Income Tax Return 2024
Poverty in India: भारतात गरिबी झाली कमी; गेल्या 12 वर्षांत परिस्थितीत असा झाला बदल, अहवालात नेमकं काय?

पडताळणी करण्यास विसरू नका

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही आधारवर वन टाइम पासवर्ड (OTP) मागू शकता, नेट बँकिंग वापरू शकता किंवा ITR-V च्या प्रतीवर स्वाक्षरी करू शकता आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरला पाठवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com