Demat Account: डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस राहिलेत. त्यामुळे नवं वर्ष उजडायच्या आत तुम्हाला काही कामं उरकायला लागणार आहेत. कारण असं न केल्यास तुम्हाला नुकसान सोसावे लागेल.
यात सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे डिमॅट खात्यात नॉमिनी जोडणे. तुमचे डिमॅट खाते असेल आणि त्यात नॉमिनी जोडलेले नसल्यास, हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, नाहीतर तुमचे अकाउंट फ्रीज होऊ शकते.
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंड खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसूनही हे काम अगदी सहज करू शकता.
- डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी, आधी लॉग इन करा
- माय प्रोफाईल (My Profile) सेक्शनवर जा आणि नॉमिनी डिटेल्सवर (Nominee Details) क्लिक करा.
- आता ऍड नॉमिनी (Add Nominee) किंवा Opt Out ऑप्शन क्लिक करा.
- यानंतर, नॉमिनीचे तपशील जसे की नाव, पॅन क्रमांक, पत्ता इत्यादी भरा आणि आयडी प्रूफ अपलोड करा.
- 'टक्केवारी' मध्ये नॉमिनीचा हिस्सा टाका.
- त्यानंतर आधार क्रमांक टाका आणि ओटीपीद्वारे डॉक्युमेंटवर ई-साईन करा.
- यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि 24-48 तासांत नॉमिनी जोडला जाईल
खातेदाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नॉमिनी कायदेशीररित्या त्याची जबाबदारी घेतो. नॉमिनीला त्या खात्यातून सर्व पैसे काढून खाते बंद करण्याचा अधिकार आहे. नॉमिनी तुमचा उत्तराधिकारी असेलच असे नाही.
तुम्ही कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा इतर कोणत्याही विश्वासू व्यक्तीला तुमचा नॉमिनी बनवू शकता. नॉमिनी ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्या मतांनुसार तुमची मालमत्ता तुमच्या वारसांना वितरित करते.
तुमच्या मालमत्तेसाठी कोणीही नॉमिनी नसल्यास, अकाउंट होल्डरच्या मृत्यूनंतर संबंधित मालमत्ता बुडू शकते. त्यामुळे तुम्ही अद्याप नॉमिनी डिक्लेरेशन केले नसेल तर ते तातडीने करा.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.