Real Estate: गेल्या वर्षभरात (2023) राजधानी क्षेत्रात (दिल्ली-एनसीआर) घरांच्या मागणीत घसरण झाली, तर मुंबईत मागणीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुंबई पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी बाजारपेठ बनली.
मालमत्ता सल्लागार फर्म अॅनारॉकने वर्षाच्या शेवटी रिअल इस्टेटवर एक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात गृहनिर्माण क्षेत्रातील ट्रेंड आणि आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, गेल्या वर्षभरात मुंबईतील घरांची मागणी दीड लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. घरांच्या मागणीच्या बाबतीत मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले दिल्ली-एनसीआर गेल्या वर्षभरात तिसऱ्या क्रमांकावर घसरले.
मुंबईत 'इतक्या' घरांची विक्री
2023 मध्ये मुंबईमध्ये 1,53,870 घरांची विक्री झाली आहे. 2022 मध्ये मुंबईत 1,09,730 घरांची विक्री झाली होती. 2023 मध्ये नवीन मालमत्ता लाँच करण्याच्या बाबतीतही एक विक्रम केला गेला.
गेल्या वर्षभरात मुंबईत 1,57,700 नवीन गृहनिर्माण मालमत्ता लाँच करण्यात आल्या, 2022 च्या तुलनेत 27 टक्क्यांनी अधिक आहे. या कालावधीत घरांच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढून 13,700 रुपये प्रति चौरस फूट झाल्या.
2023 मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये 65,625 घरे विकली गेली. एका वर्षापूर्वी म्हणजेच 2022 मध्ये 63,710 घरे विकली गेली होती त्यापेक्षा हे प्रमाण केवळ 3 टक्के जास्त आहे.
या कालावधीत नवीन लाँचमध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आणि ही संख्या 36,735 युनिट्सवर पोहोचली. मात्र, ही संख्या इतर अनेक शहरांच्या तुलनेत खूपच कमी होती.
इतर शहरांची स्थिती
गेल्या वर्षभरात, बेंगळुरूमध्ये 54,435 युनिट्स, पुण्यात 83,625 युनिट्स आणि हैदराबादमध्ये 76,345 युनिट्स लाँच करण्यात आली.
मागणीच्या बाबतीत 2023 मध्ये पुण्याने दिल्ली-एनसीआरला मागे टाकले. दिल्ली-एनसीआर, जे सहसा दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, यावेळी तिसर्या स्थानावर घसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.