Abhay Bhutada Salary: लातूर म्हटलं की आपल्या डोक्यात येतं अभ्यासाचा लातूर पॅटर्न आणि विलासराव देशमुख. पण लातूर आणि लातूरकरांचा इतिहास खूप मोठा आहे. इथला अभ्यासाचा पॅटर्न जसा फेमस आहे तसंच इथले मुलंही त्यांच्या कर्तृत्वामुळे फेमस आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभय भुतडा.
अभय भुतडा हे पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत, अभय हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अभय भुतडा यांचा जन्म 12 सप्टेंबर 1985 (वय 37) लातूरमध्ये झाला.
2005 मध्ये त्यांनी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून कॉमर्समध्ये पदवी संपादन केली आणि 2009 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट बनले. पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी FY23 मध्ये 78.1 कोटी रुपये पगार घेतला त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाचा घेतलेला थोडक्यात आढावा.
अभय यांनी 2010 मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये एसएमई फायनान्स प्रोफेशनल म्हणून आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. त्यांना अनेक पुरस्कार मिळवले. 2016 मध्ये, अभय यांनी TAB Capital Limited ची स्थापना केली, जी डिजिटल-कर्ज देणारी NBFC MSME आणि ग्राहक कर्जासह किरकोळ कर्जांवर लक्ष केंद्रित करते.
2019 पासुन अभय यांनी पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने पहिल्या वर्षातच नफा नोंदवला आणि केअर रेटिंग्स लिमिटेडकडून "AA+" चे क्रेडिट रेटिंग मिळवले.
सध्या, अभय पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे एमडी म्हणून काम करतात, नवीन व्यवसाय विकसित करण्यावर, व्यवसायाचे डिजिटलायझेशन, जोखीम व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करतात.
अभय CII, ASSOCHAM, FICCI आणि FIDC सारख्या प्रसिद्ध उद्योगांचे सदस्य म्हणून काम पाहतात. त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्येही योगदान दिले आहे.
उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना "यंग एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया 2017", "प्रॉमिसिंग एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया 2019," आणि "2020-21 साठी 40 सर्वात प्रभावशाली लिडर" चा पुरस्कार मिळाला आहे.
अभय यांचा विश्वास आहे की प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे, प्रत्येक अपयश ही एक पायरी आहे आणि प्रत्येक टप्पा म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची आणि सुधारण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.