Layoff 2023 : आता आरोग्य आणि वित्त क्षेत्रात होणार मोठी कर्मचारी कपात; पाहा आकडेवारी

गेल्या काही महिन्यांत हजारो कर्माचारी कपातीनंतर आता पुन्हा एकदा कर्माचारी कपातीचे संकट निर्माण झाले आहे.
Layoffs
LayoffsSakal
Updated on

Layoff 2023 : गेल्या काही महिन्यांत हजारो कर्माचारी कपातीनंतर आता पुन्हा एकदा कर्माचारी कपातीचे संकट आर्थिक आणि आरोग्य सेवा क्षेत्रावर आले आहे. असे ब्लूमबर्गच्या विश्लेषण अहवालात सांगितले आहे. 

आणखी काही आठवड्यात, नोकर कपातीचा आणखी एक टप्पा पार पडू शकतो. मेटा कंपनीने नोव्हेंबरमध्ये अगोदरच 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यात आणखीन 1,000 कर्मचाऱ्यांची भर पडू शकते. असे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. (Next Big Job Cuts Will Be in Finance and Health Care, Data Show)

अलिकडच्या काही महिन्यांत हजारो कर्मचारी कपातीनंतर, येणाऱ्या काळात कोणते उद्योग कर्मचारी कपात करू शकतील याचे निष्कर्ष ब्लूमबर्गने काढले आहेत. हे निष्कर्ष कंपन्यांच्या शेअर्सची कामगिरी आणि त्यांचे उत्पन्न यावरून काढले गेले आहेत.

S&P 500 मध्ये 105 कंपन्या आहेत ज्यांचे प्रति कर्मचारी महसूल, प्रत्येक कर्मचार्‍याने उत्पन्न केलेल्या महसुलाची सरासरी रक्कम, कंपनी किती कार्यक्षमतेने चालवली जाते यासाठी हा एक चांगला मापक आहे.

याचा अर्थ असा आहे की एकतर विक्री कमी झाली आहे किंवा व्यवस्थापनाने व्यवसायाचा विस्तार करण्यापेक्षा अधिक वेगाने नवीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. या मापकांवर हे निष्कर्ष काढले आहेत.

त्या 105 शेअर्सपैकी, सुमारे 60 शेअर्सनी गेल्या वर्षभरात व्यापक बाजारपेठेला मागे टाकले आहे. मेटाने S&P 500 पेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे, परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर मेटाने कर्मचारी कपात केली आहे.

2019 ते 2022 या कालावधीत सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रति कर्मचारी महसुलात 14% घट ही निर्देशांकातील कंपन्यांमधील सर्वात जास्त घसरण होती.

Layoffs
Fixed Deposit : या बँकांमध्ये मिळत आहे FDवर ८ ते ८.५० टक्के व्याजदर; भरगोस मिळेल परतावा

12 वित्तीय कंपन्या, त्यानंतर 10 आरोग्य-सेवा कंपन्या. बँकिंग उद्योगातील बँक ऑफ अमेरिका आणि सिटीग्रुप ही मोठी नावे आहेत. या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत. या कंपन्या मोठ्या रोजगार देणाऱ्या कंपन्या आहेत.

त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीचा परिणाम कर्मचारी कपातीवर होऊ शकतो. येणाऱ्या काळात या क्षेत्रात कर्मचारी कपातीची शक्यता आहे.

Amazon.com Inc. ही आणखी एक टेक दिग्गज कंपनी आहे. आधीच मोठ्या संख्येने कंपनीने कार्मचारी कपातीची घोषणा केली आहे. परंतु 2022 च्या शेवटी कंपनीने काम केलेल्या 1.5 दशलक्ष लोकांपैकी 18,000 कर्मचाऱ्यांना काढूल टाकले आहे.

त्यात फक्त 1.2% नोकऱ्या कमी झाल्या आहेत. कंपनीचे अपेक्षित कमाईच्या तुलनेत स्टॉक अजूनही ऐतिहासिक नीचांकी जवळ ट्रेडिंग करत आहे. त्यामुळे कंपनी आणखीन कर्मचारी कपात करू शकते.

2023 मध्ये अमेरिकेसह संपूर्ण जग मंदीच्या गर्तेत आहे. अशा परिस्थितीत 2022 सालापासूनच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती. यामध्ये ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकची मूळ कंपनी मेटा अशा अनेक बड्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

Layoffs
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.