Tata Group: फक्त माया नाही तर हे दोन टाटा चालवू शकतात कंपनीची गादी! खुद्द रतन टाटा देतायत ट्रेनिंग

The Next Generation of Tata: टाटा समूह हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह आहे. भारतातील लोकांचा या ब्रँडवर वर्षानुवर्षे विश्वास आहे. मिठापासून ट्रकपर्यंत सर्व वस्तू बनवणाऱ्या टाटा समूहाचा इतिहास सुमारे दीडशे वर्षांचा आहे.
The Next Generation of Tata
The Next Generation of TataSakal
Updated on

Leah, Maya, and Neville Tata: टाटा समूह हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह आहे. भारतातील लोकांचा या ब्रँडवर वर्षानुवर्षे विश्वास आहे. मिठापासून ते ट्रकपर्यंत सर्व वस्तू बनवणाऱ्या टाटा समूहाचा इतिहास सुमारे दीडशे वर्षांचा आहे. अवघ्या 21 हजार रुपयांपासून सुरू झालेला टाटा समूहाचा व्यवसाय आज 24 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

रतन टाटा यांनी 1990 ते 2012 या कालावधीत त्यांनी या समूहाचे अध्यक्षपद भूषवले. या कार्यकाळात त्यांनी कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेले. 85 व्या वर्षी रतन टाटा यांनी आपले लक्ष टाटा वंशजांच्या पुढच्या पिढीकडे वळवले. लेआ, माया आणि नेव्हिल टाटा हे टाटा समूहाचे पुढचे उत्तराधिकारी आहेत असे मानले जात आहे. ही तीनही मुले नोएल टाटांची आहेत.

टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डाने नोएल टाटांच्या तीनही मुलांचा ट्रस्टमध्ये समावेश केला आहे. टाटा मेडिकल सेंटर ट्रस्ट ही टाटा समूहाची उपकंपनी आहे. कंपनीत मोठी भूमिका बजावण्यासाठी या तिघांचाही बोर्डात समावेश करण्यात आला आहे.

टाटा समूहाच्या पुढील पिढीतील हे तीन नवीन सदस्य रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेत आहेत. रतन टाटा, विजय सिंग आणि मेहली मिस्त्री हे टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डावर आधीच आहेत. हा ट्रस्ट कोलकातामध्ये कॅन्सर हॉस्पिटल चालवतो. या तिघांच्या नियुक्तीमुळे टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमधील विश्वस्तांची संख्या दुपटीने वाढली आहे.

नवीन पिढीतील या तीन मुलांना टाटा ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यामागचा हेतू स्पष्ट आहे. लेआ, माया आणि नेव्हिल यांना टाटा समूहाची पुढील कमान संभाळण्यासाठी तयार केले जात आहे. यानंतर त्यांना समूहात मोठी भूमिका देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल हे टाटा समूहाचे भागधारक देखील आहेत. टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमध्ये सामील होणाऱ्या नोएल टाटांच्या या तीन मुलांबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही.

नोएल यांची तीन मुले टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. लेआ, माया आणि नेव्हिल ट्रस्टमध्ये येण्यापूर्वीच समूहात सक्रिय आहेत. पण, टाटा समूहातील या तीन पुढच्या पिढीतील वंशजांची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. लेआ, माया आणि नेव्हिल या तिघांचे वय 30 ते 40 च्या दरम्यान आहे.

नोएल टाटा हे सध्या ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 2019 मध्ये टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे बोर्ड सदस्य म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला.

The Next Generation of Tata
Gold Bond: गोल्ड बाँडमधील गुंतवणूक 8 वर्षांत झाली दुप्पट; 5 ऑगस्टला होणार पेमेंट, खात्यात किती पैसे येणार?

2022 मध्ये नोएल यांना सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून स्थान देण्यात आले. सध्या नोएल टाटा इंटरनॅशनलचे एमडी म्हणूनही काम करत आहेत. याशिवाय ते टायटन कंपनीचे उपाध्यक्षही आहेत. ते नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत.

कोण आहेत लेआ टाटा?

तीन भावंडांमध्ये लेआ सर्वात मोठी आहे. ती नोएल टाटा यांची मोठी मुलगी आहे. त्यांनी माद्रिद, स्पेनमधील IE बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगचे शिक्षण घेतले. 2006 मध्ये, लेआ यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली.

लेआ 39 वर्षांच्या आहेत. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. लेआ सध्या इंडियन हॉटेल कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. हीच कंपनी 2007 पासून ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स चालवत आहे.

माया टाटा कोण आहेत?

माया यांचे वय अवघे 36 वर्षे आहे. बेज बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक, ब्रिटनमधून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. माया यापूर्वी टाटा अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये काम करत होत्या. तेथे त्यांनी गुंतवणूकदार पोर्टफोलिओ व्यवस्थापन हाताळले.

टाटा अपॉर्च्युनिटी फंड अचानक बंद झाल्यानंतर त्या टाटा डिजिटलमध्ये सामील झाल्या. सध्या माया फक्त टाटा डिजिटलशी संबंधित आहेत. याआधी त्यांनी टाटा कॅपिटलमध्येही काही काळ काम केले होते.

The Next Generation of Tata
Share Market: शेअर बाजारात होणार मोठा बदल; सेबी घेणार AIची मदत, गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?

नेव्हिल टाटा कोण आहेत?

नेव्हिल हे नोएल टाटा यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान आहेत. त्यांचे वय 32 वर्षे आहे. त्यांनी बेज बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नेव्हिल सध्या रिटेल चेन ट्रेंट लिमिटेडशी संबंधित आहे. त्यांची आजी सिमोन यांनी याची स्थापना केली होती. याशिवाय नेव्हिल फॅशन रिटेल ब्रँड ज्युडिओ स्टोअर्सचे संचालन देखील सांभाळत आहेत.

हा ब्रँड चालवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. आपल्या मोठ्या बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवत, नेव्हिल टाटा यांनी बहुराष्ट्रीय टाटा समूहाच्या विस्तारात अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. लेआ, माया आणि नेव्हिल टाटा हे टाटा समूहातील पुढच्या पिढीचे नेतृत्व करत आहेत. रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकत आहेत आणि समूहामध्ये योगदान देत आहेत. टाटांच्या पुढच्या पिढीची कमान या तीन तरुणांच्या खांद्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.