Tata Group: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) रतन टाटा यांची कंपनी टाटा मोटर्समधील आपला हिस्सा कमी केला आहे. एलआयसीने जाहीर केले की टाटा मोटर्स लिमिटेडमधील त्यांचा हिस्सा पूर्वी 5.11 टक्के होता, जो कमी करून 3.09 टक्के करण्यात आला आहे.
ही बातमी येताच दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाली. मंगळवारी टाटा मोटर्सचे शेअर्स 0.11% घसरून 730 रुपयांवर बंद झाले, तर LIC चे शेअर्स 0.87% घसरून 794.70 रुपयांवर बंद झाले.
लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया (LIC) ने फाइलिंगमध्ये माहिती दिली की टाटा मोटर्समधील त्यांची हिस्सेदारी SEBI नियम, 2015 अंतर्गत कमी करण्यात आली आहे. टाटा मोटर्समधील LIC चे इक्विटी शेअर्स 169,802,847 वरून 102,752,081 इक्विटी शेअर्सवर कमी झाले आहेत.
ज्यामुळे त्यांची हिस्सेदारी 5.110 टक्क्यांवरून 3.09 टक्के झाली आहे. LIC ने म्हटले आहे की 28 ऑगस्ट 2015 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत होल्डिंग 2 टक्क्यांनी कमी झाली आहे.
शेअर्स कोणत्या किंमतीला विकले जातात?
LIC ने 28 ऑगस्ट 2015 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत रतन टाटा यांची कंपनी टाटा मोटर्स मधील 2.018 टक्के भागभांडवल सरासरी 711.65 रुपये किंमतीत विकले आहे.
टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या 730 रुपयांवर आहेत. टाटा मोटर्सच्या शेअर्सने एका महिन्यात 8.10% परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत 25 टक्के आणि एका वर्षात सुमारे 75 टक्के परतावा दिला आहे.
कंपनी जगभरातील कारचा पुरवठा करते
टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स भारतात तसेच जगातील अनेक देशांमध्ये वाहने विकते. टाटा मोटर्स ही जगातील सर्वोच्च ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी कार, स्पोर्ट्स वाहने, ट्रक, बस आणि संरक्षण वापरासाठी वाहने बनवते आणि विकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.