LIC Net Profit: सरकारी विमा कंपनी LIC ने मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे.
या दरम्यान, कंपनीच्या नफ्यात सुमारे 5 पट वाढ दिसून आली. मात्र, दुसरीकडे कंपनीला मोठा धक्का बसला आहे. कारण या काळात कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात घट झाली आहे.
एलआयसीच्या नफ्यात वाढ:
सरकारी विमा कंपनीने बुधवारी संध्याकाळी उशिरा गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 13,428 कोटी रुपये होता.
मागील वर्षीच्या म्हणजेच मार्च 2022 च्या तिमाहीतील 2,371 कोटी रुपयांच्या तुलनेत हे 466 टक्के अधिक आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा पाच पटीने वाढून 13,191 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नफा वाढला, महसूल घटला:
विमा कंपनीने बुधवारी मार्च तिमाहीची आपली तिमाही आकडेवारी जाहीर केली. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा पाच पटीने वाढून 13,191 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 2,409 कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 2,01,022 कोटी रुपयांवर आला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 2,15,487 कोटी रुपये होता.
वर्षभरात नफा वाढला:
संपूर्ण आर्थिक वर्षातही एलआयसीचा नफा अनेक पटींनी वाढला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, कंपनीचा निव्वळ नफा 35,997 कोटी रुपयांपर्यंत वाढला, जो 2021-22 मध्ये केवळ 4,125 कोटी रुपये होता.
बोर्डाने लाभांशाची केली शिफारस:
LIC च्या संचालक मंडळाने 2022-23 साठी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति शेअर 3 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. एलआयसीचा शेअर बुधवारी बीएसईवर 0.61 टक्क्यांनी वाढून 593.55 रुपयांवर बंद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.