LIC ची सुपरहिट योजना! सरकारी नोकरी नसली तरी दरमहा मिळणार 16 हजार पेन्शन, अशी करा गुंतवणूक

LIC Jeevan Akshay Policy: सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
LIC Jeevan Akshay Policy
LIC Jeevan Akshay Policyesakal
Updated on

LIC Jeevan Akshay Policy: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) प्रत्येक वर्गातील गुंतवणूकदारांसाठी अनेक आकर्षक पॉलिसी तयार करते आणि मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी LIC पॉलिसींवर विश्वास ठेवतात.

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीचे नियोजन अगोदरच करणे आवश्यक होते. सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी LIC जीवन अक्षय पॉलिसीचा यात समावेश आहे.

जीवन अक्षय योजना ही तत्काळ वार्षिकी योजना आहे, जी एकल प्रीमियम पॉलिसी आहे आणि त्यात एक रकमी पैसे गुंतवावे लागतात.

LIC Jeevan Akshay Policy
PNB Scam: मेहुल चोक्सीच्या पत्नीची जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

या योजनेत तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी जास्त पेन्शन मिळेल. तुम्ही किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. आणि किमान वय 30 वर्षे असावे.

जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 28,625 रुपये वार्षिक परतावा मिळेल. 2,315 रुपये दरमहा, 6,988 रुपये तिमाही, सहामाही रुपये 14,088 पेन्शन मिळेल.

LIC Jeevan Akshay Policy
Chandrayaan 3: चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वीच 'या' कंपनीच्या शेअरमध्ये झाली 10 टक्के वाढ

दरमहा 16,000 पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर LIC जीवन अक्षय प्लॅनद्वारे दरमहा 16,000 रुपये पेन्शन मिळवायची असेल, तर तुम्हाला यासाठी 35 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

यासह, तुम्हाला दरमहा 16,479 रुपये, त्रैमासिक रुपये 49,744, सहामाही रुपये 1,00,275 आणि वार्षिक 2,03,700 रुपये पेन्शन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.