LIC: एलआयसी विकणार मुंबईसह 'या' शहरांमधील मालमत्ता; कंपनीवर ही वेळ का आली?

LIC Sale Land, Building: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) देशातील मेट्रो शहरांमधील रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी करत आहे. या मालमत्तेच्या विक्रीतून LIC 6-7 अब्ज डॉलर उभे करण्याची योजना आखत आहे.
LIC Sale Land, Building
LIC Sale Land, BuildingSakal
Updated on

LIC Sale Land, Building: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) देशातील मेट्रो शहरांमधील रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी करत आहे. या मालमत्तेच्या विक्रीतून LIC 6-7 अब्ज डॉलर उभे करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनी आपले भूखंड आणि व्यावसायिक इमारती विकणार आहे. एलआयसीने मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अंतर्गत टीमला निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी मुंबईतील आपली मालमत्ता विकून प्रक्रिया सुरू करणार आहे.

LIC कंपनीकडे दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील जीवन भारती बिल्डिंग, कोलकाता येथील चित्तरंजन अव्हेन्यू LIC बिल्डिंग आणि एशियाटिक सोसायटी आणि मुंबईतील अकबरेलीच्या मालमत्तांचा समावेश आहे.

एका अहवालानुसार, अंतिम मूल्यांकनादरम्यान, या मालमत्तेची एकूण किंमत 50-60 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. यासह, LIC ही देशातील सर्वात मोठी विमा सेवा देणारी आणि शेअर बाजारात सर्वाधिक गुंतवणूक करणारी कंपनी आहे.

LIC Sale Land, Building
Most Expensive Cities: मुंबई भारतातील सर्वात महागडे शहर; पुणे कोणत्या नंबरवर? पहा संपूर्ण यादी

सार्वजनिक क्षेत्रातील या विमा कंपनीकडे 51 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अहवालानुसार, विक्री प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कंपनी आपल्या मालमत्तेचे मूल्यांकन सुरू करू शकते. एलआयसीने त्यांच्या अनेक मालमत्तेचे मूल्यांकन केलेले नाही आणि या मालमत्तेचे मूल्यांकन त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा पाचपट जास्त असू शकते.

LIC Sale Land, Building
Amit Shah: अमित शाहांना 'स्टॉक मार्केट'बाबत केलेले वक्तव्य भोवणार! सेबी घेणार दखल? काय आहे प्रकरण?

2023-24 या आर्थिक वर्षात LIC चा नफा 40,676 कोटी रुपये होता. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी भारतात जमिनीच्या मालकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत भारतीय रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. LIC तिच्या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि विक्रीसाठी एक नवीन संस्था तयार करू शकते. कंपनीने मालमत्ता विकल्यास नफा वाढू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.