Penalty on LIC: आयकर विभागाने LICला ठोठावला 84 कोटी रुपयांचा दंड, काय आहे कारण?

Penalty on LIC: LIC कंपनी न्यायालयात अपील करणार आहे
LIC
LICsakal
Updated on

Penalty on LIC: LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आणि गुंतवणूकदार कंपनी आहे. मात्र, आता एलआयसीला आयकर विभागाकडून धक्का बसला आहे. आयकर विभागाने एलआयसीला नोटीस पाठवली असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयकर विभागाने भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या सरकारी कंपनीला 84 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एलआयसीने आपल्या एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, हा दंड 2012-13, 2018-19 आणि 2019-20 या मूल्यांकन वर्षांसाठी लावण्यात आला आहे. विमा कंपनीने सांगितले की ते अपील प्राधिकरणासमोर अपील दाखल करणार आहे.

LICला दंड का ठोठावला?

एलआयसीला 2012-13 च्या मूल्यांकन वर्षासाठी 12.61 कोटी रुपये, 2018-19 साठी 33.82 कोटी रुपये, तर 2019-20 साठी 37.58 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. एलआयसीने सांगितले की कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आयकर कायदा, 1961 च्या कलम 271(1)(C) आणि 270A अंतर्गत हा दंड ठोठावण्यात आला आहे.

LIC
GST Notice: ड्रीम 11 ला DGGIचा दणका! पाठवली 28,000 कोटी रुपयांची नोटीस, काय आहे प्रकरण?

LIC ची मालमत्ता किती?

LIC ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची जीवन विमा आणि गुंतवणूक कंपनी आहे. ही कंपनी 1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह सुरू झाली होती आणि आता 31 मार्च 2023 पर्यंत, LIC कडे 45.50 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

LIC
JSW Infrastructure IPO: गुंतवणूकदार मालामाल! BSE वर 20% प्रीमियमसह कंपनी झाली लिस्ट

विमा पॉलिसींच्या बदल्यात लोकांची बचत गोळा करणे आणि देशातील बचतीला चालना देणे, सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवून लोकांच्या भांडवलाचे संरक्षण करणे, वाजवी दरात विमा पॉलिसी जारी करणे, उद्योगांना वाजवी व्याजदरावर कर्ज देणे हे LIC चे काम आहे.

LIC च्या शेअरमध्ये घसरण

व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, काल एनएसईवर एलआयसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. काल LIC चे शेअर 4.75 पैशांनी घसरून 645.00 रुपयांवर बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.