LIC Notice: एलआयसीला आणखी एक धक्का! मिळाली 3,529 कोटी रुपयांची कर नोटीस; काय आहे प्रकरण?

LIC Gets Tax Notice: भारतीय आयुर्विमा महामंडळाला एकूण 3,529 कोटी रुपयांच्या कर मागणीबाबत दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाने ही नोटीस बजावल्या आहेत. कंपनीने याबाबत शेअर बाजाराला माहिती दिली आहे. एलआयसीने सांगितले की ते या नोटीस विरुद्ध आयुक्त (अपील), मुंबई यांच्याकडे अपील दाखल करणार आहे.
LIC receives GST notice
LIC receives GST noticeSakal
Updated on

LIC Gets Tax Notice: भारतीय आयुर्विमा महामंडळाला एकूण 3,529 कोटी रुपयांच्या कर मागणीबाबत दोन नोटीसा पाठवल्या आहेत. आयकर विभागाने या नोटीसा बजावल्या आहेत. कंपनीने याबाबत शेअर बाजाराला माहिती दिली आहे. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार कर मागणीच्या या नोटीसा आयकर सहायक आयुक्त, मुंबई यांनी पाठवल्या आहेत.

कंपनीकडून 3529 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. एक नोटीस 2133.67 कोटी रुपयांची आहे आणि 2012-13, 2013-14, 2014-15, 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 या वर्षांसाठी आहे. दुसरी नोटीस 1,395.08 कोटी रुपयांची आहे आणि वर्ष 2015-16 साठी आहे.

नियामक फाइलिंगमध्ये, एलआयसीने सांगितले की ते या नोटीस विरुद्ध आयुक्त (अपील), मुंबई यांच्याकडे अपील दाखल करणार आहे. एलआयसीच्या म्हणण्यानुसार, या नोटीसांचा कंपनीच्या आर्थिक, ऑपरेशन्स किंवा इतर व्यवहारांवर कोणताही परिणाम झालेला नाही.

LIC receives GST notice
India-Maldives Row: 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत

आयकर विभागाकडून एलआयसीला मिळालेल्या नोटीसीचा अद्याप त्यांच्या शेअर्सवर विशेष परिणाम झालेला नाही. बीएसई वर सकाळी कंपनीचा शेअर 830.50 वर उघडला आणि त्याच्या आधीच्या बंद किंमतीच्या घसरणीसह 826.55 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. सकाळी 9.30 वाजता एलआयसीचा शेअर 0.60 टक्क्यांनी घसरून 829 रुपयांवर व्यवहार करत होता.

अलीकडेच एलआयसीला महाराष्ट्र कर विभागाकडून 806 कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती. यानंतर, कंपनीला तामिळनाडू, गुजरात आणि उत्तराखंड या आणखी तीन राज्यांच्या कर विभागांकडून जीएसटी मागणी नोटीस मिळाली होती.

LIC receives GST notice
टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनी 70 टक्के कर्मचार्‍यांना देणार 100 टक्के 'व्हेरिएबल पे'

तीन राज्यांनी एलआयसीकडून एकूण 668 कोटी रुपयांची जीएसटी मागणी केली आहे. या रकमेत व्याज आणि दंडाचाही समावेश आहे.

LIC नुसार, तामिळनाडूच्या कर प्राधिकरणाकडून 6,634,514,426 रुपये, उत्तराखंडच्या कर प्राधिकरणाकडून 42,818,506 रुपये आणि गुजरातच्या कर प्राधिकरणाकडून 3,939,168 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.