LIC Market Cap: LIC बनली देशातील 5वी सर्वात मौल्यवान कंपनी; मार्केट कॅप 7 लाख कोटी रुपयांच्या पुढे

LIC Market Cap: भारतीय आयुर्विमा महामंडळ LICचे मार्केट कॅप 7 लाख कोटींच्या पुढे गेले आहे आणि ती देशातील पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. तिमाही निकालानंतर, शुक्रवारी LIC च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे
LIC’s market cap crosses Rs 7 lakh crore, becomes fifth most valued Indian company
LIC’s market cap crosses Rs 7 lakh crore, becomes fifth most valued Indian companySakal
Updated on

LIC Market Cap: भारतीय आयुर्विमा महामंडळ LICचे मार्केट कॅप 7 लाख कोटींच्या पुढे गेले आहे आणि ती देशातील पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. तिमाही निकालानंतर, शुक्रवारी LIC च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे, शेअरमध्ये 6% पेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे LICचे मार्केट कॅप 7 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

सोमवारपासून एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्याचे बाजार भांडवल 6 लाख कोटींच्या पुढे गेले होते. शेअरचा भावही सोमवारी प्रथमच एक हजार रुपयांच्या पुढे गेला. (LIC Becomes Fifth Largest Company By Market Cap As Stock Hits Record High)

LIC आता देशातील 5वी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. LIC च्या आधी सर्वात मौल्यवान असलेल्या कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज, क्रमांक 2 वर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, क्रमांक 3 वर HDFC बँक आणि 4 व्या क्रमांकावर ICICI बँक आहेत.

LIC’s market cap crosses Rs 7 lakh crore, becomes fifth most valued Indian company
SEBI: सेबीचा मोठा निर्णय! स्टॉक मार्केट टिप्स देणाऱ्या 'या' बिझनेस चॅनेलवरील तज्ज्ञांवर घातली बंदी

LIC चे शेअर्स 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या शेअरची किंमत शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात 6 टक्क्यांहून अधिक वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली. (LIC becomes fifth most valuable firm as stocks soar)

एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण?

एलआयसीच्या शेअर्सचे भाव सातत्याने वाढत आहेत. कंपनीच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींच्या सकारात्मक टिप्पण्यांमुळे एलआयसीच्या मार्केट कॅपने गुरुवारी प्रथमच 7 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. याशिवाय, कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळेही तिच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

LIC’s market cap crosses Rs 7 lakh crore, becomes fifth most valued Indian company
IPO News: एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्सचा आयपीओ आज होणार खुला, काय आहे प्राइस बँड?

LICने 17 मे 2022 रोजी लिस्ट झाल्यापासून त्यांच्या गुंतवणूकदारांना 28 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. LIC च्या शेअर्सच्या किंमतीत आता 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शुक्रवारी एलआयसीच्या शेअरची किंमत बीएसईवर 1175 रुपयांच्या नव्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.