Adani Group: अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीवर LIC प्रमुखांचे मोठे वक्तव्य, गुंतवणूक करून आम्हाला...

Adani Group: संसदेपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वत्र LICची चर्चा होत आहे.
Gautam Adani lic
Gautam Adani licSakal
Updated on

Adani Group: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ सध्या खूप चर्चेत आहे. संसदेपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वत्र एलआयसीची चर्चा होत आहे. दरम्यान, अदानीच्या गुंतवणुकीवर एलआयसीचे प्रमुख सिद्धार्थ मोहंती यांचे मोठे वक्तव्य आले आहे.

एलआयसीवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी संसदेत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करून कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, एलआयसी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचे कौतुक केल्यापासून गुंतवणूकदार, पॉलिसीधारक आणि भागधारकांप्रती त्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व आणखी वाढले आहे.

Gautam Adani lic
Success Story: शाब्बास रे पठ्ठ्या! शाळेत जाण्याच्या वयात सुरू केली कंपनी, आज आहे 100 कोटींचा मालक

अदानी यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यात काहीही नुकसान नाही

एलआयसीचे प्रमुख सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, आम्ही कोणत्याही एका कंपनीबद्दल बोलू इच्छित नाही, परंतु अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करून एलआयसीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आम्ही धोरणे आणि प्रोटोकॉलनुसार अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे.

जेव्हा कंपनीच्या शेअर्सचे भाव कमी होते तेव्हा आम्ही गुंतवणूक केली आणि जसजसे भाव वाढू लागले, तेव्हा आम्हाला गुंतवणुकीचा फायदा झाला.

Gautam Adani lic
ITR Filing 2023: वेळेवर ITR दाखल करणाऱ्यांनाही भरावा लागेल 5,000 रुपये दंड, कारण...

अंतर्गत प्रोटोकॉल आणि नियम लक्षात घेऊन अदानीमध्ये गुंतवणूक केली. विशेष म्हणजे LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. येथे 13 लाख विमा एजंट आहेत. ते म्हणाले की, एजंट्सची संख्या वाढवण्याची गरज आहे.

एलआयसी कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 683 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. एलआयसीने शेअर बाजाराला सांगितले की, जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून रु. 1,88,749 कोटी झाले आहे जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 1,68,881 कोटी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()