Losing Wealth List : फक्त अदानी-अंबानींचेच नाही तर 'या' भारतीय उद्योगपतीचेही कोट्यावधी रुपये पाण्यात

वर्षाच्या सुरुवातीपासून गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यानंतर सर्वाधिक नुकसान झाले आहे.
 Radhakishan Damani
Radhakishan DamaniSakal
Updated on

Radhakishan Damani Net Worth : डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती 16.7 अब्ज डॉलर आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत 97 व्या स्थानावर आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांना गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यानंतर सर्वाधिक नुकसान झाले आहे. (Dmart’s Radhakishan Damani Third In The List Of Losing Most Wealth This Year, After Adani And Ambani)

2023 हे वर्ष भारतीय उद्योगपतींसाठी अतिशय निराशजनक गेले आहे. गौतम अदानी यांना जानेवारीपासून सर्वात जास्त नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी हे घसरणीचा सामना करणारे दुसरे भारतीय आहेत.

जगातील सर्व श्रीमंतांच्या तुलनेत यंदा अदानी-अंबानींनी सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. मात्र, या यादीत तिसऱ्या भारतीयाच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

1 जानेवारीपासून आतापर्यंत 22,143 कोटी पाण्यात :

राधाकिशन दमानी यांच्या संपत्तीत या वर्षी आतापर्यंत मोठी घट झाली आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत त्यांचे 2.67 अब्ज डॉलर (22,143 कोटी रुपये) बुडाले आहेत.

एकूण संपत्तीत झालेल्या या घसरणीमुळे दमाणी सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. 2023 मध्ये सर्वाधिक संपत्ती गमावलेल्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत राधाकिशन दमानी यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दमाणी यांच्या संपत्तीत 14% घट :

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, राधाकिशन दमाणी यांच्याकडे सध्या एकूण 16.7 अब्ज डॉलर्स आहेत. एवढ्या संपत्तीसह ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत 97 व्या क्रमांकावर आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून, दमानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीच्या सुमारे 14 टक्के गमावले आहेत.

राधाकिशन दमाणी हे डी-मार्टचे संस्थापक तसेच अनुभवी गुंतवणूकदार आहेत. देशात 238 ठिकाणी डीमार्ट स्टोअर्स आहेत.

'या' यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर :

सन 2022 मध्ये जगभरातील श्रीमंतांमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय दिग्गज गौतम अदानी यांनी या वर्षी सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा विक्रम केला आहे.

24 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित झालेल्या हिंडनबर्ग या अमेरिकन रिसर्च फर्मच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर आलेली त्सुनामी महिनाभरानंतरही कायम आहे.

 Radhakishan Damani
Narayana Murthy : 'अशा सापळ्यात अडकू नका...' नारायण मूर्तींचा तरुणाईला मोलाचा सल्ला

वर्षाच्या सुरुवातीला, ते टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावर होते आणि काही काळात ते टॉप-10 आणि टॉप-20 मधूनही बाहेर पडले आहेत. आता ते 33 व्या क्रमांकावर आले आहेत. या वर्षी त्यांना 80.06 अब्ज डॉलरचे मोठे नुकसान झाले आहे.

अंबानींना 'या' वर्षात आतापर्यंत किती नुकसान झाले?

रिलायन्सचे चेअरमन आणि आशियातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना 2023 मध्ये आतापर्यंत झालेल्या नुकसानीबद्दल सांगायचे तर, संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

 Radhakishan Damani
योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेपर्यंतच करा इच्छापत्र

दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांना 5.38 अब्ज डॉलर (44,618 कोटींहून अधिक) तोटा झाला आहे. ब्लूमबर्गच्या मते, अंबानी 81.7 अब्ज डॉलर संपत्तीसह टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 10 व्या स्थानावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.