LPG Cylinder Price: आनंदाची बातमी! आजपासून गॅस सिलिंडर झाला स्वस्त; किती कमी झाली किंमत?

LPG Cylinder Price Cut : 1 जुलै रोजी तेल कंपन्यांनी महागाईपासून काहीसा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. 1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
LPG Cylinder Price Cut
LPG Cylinder Price CutSakal
Updated on

LPG Cylinder Price Cut : 1 जुलै रोजी तेल कंपन्यांनी महागाईपासून काहीसा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. 1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 जुलैपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करून तो 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. एलपीजी सिलिंडरचे दर 30-31 रुपयांनी कमी झाले आहेत, ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आहे.

1 जुलैपासून सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरऐवजी व्यावसायिक सिलिंडरवर दिलासा देण्यात आला आहे. याचा अर्थ रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना या कपातीचा फायदा होईल. जे लोक व्यावसायिक एलपीजी वापरतात त्यांना आजपासून 30 रुपये स्वस्त सिलिंडर मिळणार आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

LPG Cylinder Price Cut
Investment Criteria : गुंतवणुकीचा ‘चष्मा’

गॅस सिलिंडर कुठे स्वस्त झाला?

1 जुलै 2024 पासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 30-31 रुपयांनी कमी झाली. या सिलिंडरची किंमत दिल्लीत 30 रुपयांनी तर कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत 31 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1676  रुपयांऐवजी 1646  रुपयांना मिळणार आहे.

कोलकात्यात 1756 रुपयांना, चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना आणि मुंबईत 1598 रुपयांना मिळेल. त्याचप्रमाणे, पाटण्यात 1915.5 रुपये आणि अहमदाबादमध्ये 1665 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल.

LPG Cylinder Price Cut
Pan Card : पॅन कार्ड सांभाळा!

जर आपण 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोललो तर तो दिल्लीमध्ये 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईमध्ये 802 रुपये आणि चेन्नईमध्ये 818 रुपयांना उपलब्ध आहे. लवकरच महागड्या गॅस सिलिंडरपासून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.