LPG Cylinder Price: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडर महागले, दिल्ली ते मुंबईचे नवे दर काय आहेत?

cylinders become expensive : IOCLच्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाल्या आहेत.
New LPG rates Check the latest prices in Delhi and Mumbai
New LPG rates Check the latest prices in Delhi and Mumbai esakal
Updated on

आज, 1 ऑगस्ट 2024 रोजी, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. बजेट नंतर ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केले आहेत, परंतु 14 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र तशाच आहेत. गुरुवारपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे.

दिल्ली ते मुंबईतील नवे दर-

IOCLच्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाल्या आहेत. ताज्या बदलानुसार, दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे, ज्यामध्ये प्रति सिलिंडर 6.50 रुपयांची वाढ झाली आहे.

कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे, ज्यामुळे ती किंमत 1756 रुपयांवरून 1764.50 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी वाढून 1598 रुपयांवरून 1605 रुपये झाली आहे. चेन्नईमध्येही सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून, ती किंमत 1809.50 रुपयांवरून 1817 रुपये झाली आहे.

New LPG rates Check the latest prices in Delhi and Mumbai
Share Market Closing: निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद; सेन्सेक्स 285 अंकांनी वधारला, HDFC लाइफ, JSW स्टील तेजीत

जुलैमध्ये झालेली कपात-

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. दिल्लीत 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती, त्यामुळे ती किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपये झाली होती. कोलकातामध्ये ती किंमत 1787 रुपयांवरून 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1840.50 रुपयांवरून 1809.50 रुपये आणि मुंबईमध्ये 1629 रुपयांवरून 1598 रुपये झाली होती.

घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर-

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत असताना, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत. महिला दिवसाच्या निमित्ताने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी केल्या होत्या. सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.

New LPG rates Check the latest prices in Delhi and Mumbai
Banks Ransomware Attack: 300 पेक्षा जास्त बँकांच्या सर्व्हरमध्ये शिरला व्हायरस; UPI पेमेंट बंद, तुम्ही तपासलं का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.