LPG Price Hiked Today : देशातील पाच राज्यांमध्ये काल विधानसभा निवडणूकांचे मतदान पारक पडले आणि त्याच सोबत एलपीजी सिलेंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. ही वाढ १९ किलोग्रामच्या कमर्शियल गॅस सिलेंडर च्या किमतीत झाला आहे. याचे दर २१ रुपये प्रति सिलेंडर इतके वाढले आहेत. आज १ डिसेंबर २०२३ पासून देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडरसाठी १७९६.५० रुपये मोजावे लागणार आहेत तर मागील महिन्यात याची किंमत १७७५.५० रुपये प्रति सिलेंडर होती.
महत्वाची म्हणजे सब्सिडी असणाऱ्या १४.२ किग्रॅ च्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत कुठलीही वाढ करण्यात आली नाहीये.
दिल्ली - १७९६.५० रुपये
कोलकता - १९०८.०० रुपये
मुंबई - १७४९.०० रुपये
चेन्नई - १९६८.५० रुपये
गेल्या महिन्यात १ नोव्हेंबरलाही एलपीजी (LPG Gas) सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली होती. एलपीजीच्या या किमती १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर वाढवण्यात आल्या होत्याा. या सणासुदीच्या दिवशी नागरिकांना महागाईचा झटका बसला होता.
व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्याने याचा विशेषतः फूड (Food) इंडस्ट्री आणि रेस्टॉरंट (Restaurants) व्यवसायावर परिणाम होईल, तर सामान्यांसाठी बाहेर खाणे अधिक महाग होणार आहे. ऑईल मार्केटींग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती किती वाढवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.