L&T Finance : ‘एल अँड टी फायनान्स’चे उच्चांकी कर्जसाह्य; चौथ्या तिमाहीत १५,०३० कोटी रुपयांचे कर्जवितरण

कंपनीने या चौथ्या तिमाहीत १५,०३० कोटी रुपयांचे कर्जवितरण केले असून, त्यात वार्षिक ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
L&T Finance
L&T Finance Sakal
Updated on

मुंबई : बिगर बँकिंग वित्तीय कंपनी एल अँड टी फायनान्स लि.ने (एलटीएफ) ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत, तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रिटेल कर्जवितरणात लक्षणीय कामगिरी बजावली आहे.

कंपनीने या चौथ्या तिमाहीत १५,०३० कोटी रुपयांचे कर्जवितरण केले असून, त्यात वार्षिक ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ अखेरच्या चौथ्या तिमाहीतील ७५ टक्क्यांच्या तुलनेत ३१ मार्च २०२४अखेर संपलेल्या तिमाहीत ९४ टक्के कर्जवितरण केले आहे.

कंपनीचे आत्तापर्यंतचे एकूण रिटेल वितरण आता ८०,०१० कोटी रुपयांवर गेले असून, त्यात वार्षिक ३१ टक्के वाढ झालेली आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिटेल कर्ज वितरण सुमारे ५४,२५३ कोटी रुपये असून, त्यात वार्षिक २९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

कंपनीने ग्रामीण भागातील व्यवसायांसाठी ५७६५ कोटी रुपये वित्तपुरवठा केला असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत हे वित्तसहाय्य ४४०१ कोटी रुपयांवर होते. शेतकऱ्यांना मार्चअखरेच्या तिमाहीत १५३० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले असून, गत वित्तवर्षातील याच तिमाहीत ते १५५६ कोटी रुपये होते.

शहरी भागासाठी मार्चअखरेच्या तिमाहीत ५९८० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले असून गेल्या वित्तवर्षातील याच तिमाहीत ते ४५२७ कोटी रुपये इतका होते. एसएमई क्षेत्रासाठी एकूण वित्तवितरण मार्चअखरेच्या तिमाहीत १२१० कोटी रुपये एवढे असून, गत वित्तवर्षातील याच तिमाहीत ते ६६७ कोटी रुपये होते.

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या संपूर्ण वर्षासाठी ग्रामीण भागातील व्यवसायांसाठी वर्षभरातील कर्जवितरण २१,४९२ कोटी रुपयांवर पोहचले असून, शेतकऱ्यांना वर्षभरात ६८४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. एसएमई क्षेत्रासाठी ३६५४ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.