L&T Finance : ‘एलटीएफ’तर्फे ग्रामीण भागात २५ हजार कोटींचा वित्तपुरवठा

कंपनी १४ राज्यांमधील १७०० पेक्षा जास्त शाखांमार्फत वित्तीय सेवा देत आहे.
L&T Finance to provide rs 25000 crore financing in rural India
L&T Finance to provide rs 25000 crore financing in rural IndiaSakal
Updated on

मुंबई : एल अँड टी फायनान्स लि.ने (एलटीएफ) ग्रामीण भागासाठी २५ हजार कोटी रुपयांहून अधिक वित्तपुरवठा करून एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. कंपनीचे हे यश म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण उद्योजकांना आणि लहान व्यवसाय मालकांना सक्षम बनवण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने ग्रामीण भागातील जनतेला सुलभ आणि परवडण्यायोग्य असे वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध केले असून, १.४ कोटी महिला उद्योजकांना कर्ज वितरित केले आहे. कंपनी १४ राज्यांमधील १७०० पेक्षा जास्त शाखांमार्फत वित्तीय सेवा देत आहे. बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओरिसा या राज्यांमध्ये कंपनीने चांगली वाढ नोंदवल्याचे कंपनीने म्हटले आहे.

L&T Finance to provide rs 25000 crore financing in rural India
L&T Finance : ‘एल अँड टी फायनान्स’चे उच्चांकी कर्जसाह्य; चौथ्या तिमाहीत १५,०३० कोटी रुपयांचे कर्जवितरण

कंपनीच्या ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनिया कृष्णनकुट्टी म्हणाल्या, ‘‘पंचवीस हजार कोटी रुपयांचा कर्ज वितरणाचा टप्पा गाठणे ही आमच्या ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायासाठी एक महत्त्वपूर्ण वाटचाल ठरली आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये उल्लेखनीय व्यवसाय केला आहे. गेल्या दोन वर्षांत आमचे लक्ष नवे ग्राहक मिळवणे आणि विद्यमान ग्राहक टिकवून ठेवणे या दोन्हींवर केंद्रित झालेले आहे. बाजारात प्रत्यक्षरित्या कार्यरत असलेल्या सुमारे दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी योग्य ग्राहकांची निवड करणे, ग्राहकांशी हितसंबंध कायम राखणे आणि कर्जाबाबत शिस्त सुनिश्चित करणे यावर लक्ष केंद्रीत केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.