Succes Story: शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी चालवायचा सायकल, आज आहे 882 कोटींच्या कंपनीचा मालक

एका छोट्याशा गावापासून ते दलाल स्ट्रीट पर्यंतचा प्रवास...
Succes Story
Succes StorySakal
Updated on

Succes Story: प्रत्येक यशस्वी माणसामागे नेहमीच एक दीर्घ संघर्ष जोडलेला असतो. आपल्या देशात नेते, अभिनेत्यांपासून अनेक उद्योगपतींपर्यंत अशी यशोगाथा आहे, जी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. या यादीत मधुसूदन केळा यांचे नाव समाविष्ट आहे.

या दिग्गज गुंतवणूकदाराची कहाणी चित्रपट अभिनेत्यापेक्षा कमी नाही. आर्थिक बाजारपेठेत उंची गाठण्यापूर्वी मधु केळा यांनी आयुष्यात मोठा संघर्ष पाहिला आहे.

छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या मधु केळा यांचे बालपण आणि सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले आणि नंतर तेथून बाहेर पडल्यानंतर ते थेट मुंबईला गेले आणि मग शेअर मार्केटमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. चला जाणून घेऊया मधु केळा यांनी अनेक संघर्षांनंतर हे मोठे यश कसे मिळवले.

गावातून दलाल स्ट्रीट पर्यंतचा प्रवास:

मधुसूदन केळा हे स्टॉक मार्केटमधील अनुभवी गुंतवणूकदार आणि एम.के व्हेंचर्सचे संस्थापक आहेत. छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातून येऊन त्यांनी मुंबईच्या आर्थिक बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले. छत्तीसगडमधील कुरुड या 10,000 लोकसंख्या असलेल्या गावात ते लहानाचे मोठे झाले.

मधु केळा कॉलेजला जाण्यासाठी रोज 30 किलोमीटर सायकल चालवत असे. बी.कॉम केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. हिंदी माध्यमात शिकलेल्या मधु केळा यांनी मुंबईतील प्रतिष्ठित के.जे सोमय्या मॅनेजमेंट कॉलेजमधून मास्टर ऑफ मॅनेजमेंटची पदवी घेतली.

Succes Story
Adani Group Stocks: अदानी शेअर्समुळे 'हा' गुंतवणूकदार झाला मालामाल, 100 दिवसांत कमावले 7,683 कोटी

नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू केली:

एमबीए केल्यानंतर त्यांनी सिफको आणि शेअरखानसोबत इक्विटी रिसर्चमध्ये काम केले. ते मोतीलाल ओसवाल या वित्तीय फर्ममध्ये सामील झाले आणि 1996 मध्ये यूबीएस समूहात सामील झाले.

विविध ब्रोकरेज आणि फंड हाऊससोबत काम करून त्यांनी गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून प्रचंड नफा कमवून दिला आहे.

ते साधारणपणे स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. विशेष म्हणजे या सर्व कंपन्या मल्टी बॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.

2009 नंतर त्यांनी फार्मा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आणि तेथेही त्यांना यश मिळाले. मधू केळा हे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना याचे श्रेय देतात.

जानेवारी 2018 मध्ये स्वतःची कंपनी MK Ventures सुरू केली. सध्या ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

मनीकंट्रोलनुसार, मधु केला यांची एकूण संपत्ती 882 कोटी रुपये आहे आणि त्यांच्याकडे 6 होल्डिंग कंपन्या आहेत. मधु केळा यांनी अलीकडेच रेप्रो इंडियाचे 5.75 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.

Succes Story
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.