Maharashtra Interim Budget 2024: शिंदे सरकारने आज म्हणजेच २८ जूनला विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा बजेट सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थसंकल्पात सिंधुदुर्गात स्कूबा डायविंग केंद्र उभारणार अशी घोषणा केली आहे.
प्रवासाची आवड असलेल्या लोकांना स्कूबा डायव्हिंग करण्याची देखील आवड असते. निळ्याशार समुद्रात विविध आकाराचे आणि रंगाचे मासे पाहण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. आयुष्यात एकदा तरी स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घ्यावा. यासाठी तम्ही महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांना भेट दे शकता.
तुम्हाला स्कुबा डायव्हिंगची आवड असेल तर कोकणला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कमी खर्चात डायव्हिंगचा थरारक अनूभव घेता येईल.
सिंधुदुर्गात देवबाग आणि दांडेश्वर या समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंगचा अनूभव घेता येणार आहे.
वेंगुर्ला समुद्र किनाऱ्या गोव्यापासून अगदी जवळ आहे. येथे पर्यटकांची फार गर्दी नसते. यामुळे तुम्ही सुट्ट्यांमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी येथे भेट देऊ शकता.
तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल तर मालवणला भेट देऊ शकता. तुम्ही मित्रांसोबत स्कुबा डायव्हिंगसह अनेक वॉटर अॅक्टिव्हिचा विलक्षण अनुभव घेऊ शकता.
महाराष्ट्रातील रत्नागिरीत निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. येथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता. पुणे, मुंबईपासून रत्नागिरी जवळ आहे. तुम्ही मित्रांसोबत या ठिकाणी जाऊन स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.