Maharashtra No 1 in FDI: "बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते"; महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, फडणवीसांनी शेअर केला डेटा

केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.
Maharashtra No 1 in FDI
Maharashtra No 1 in FDISakal
Updated on

मुंबई : थेट परिकीय गुंतवणूक अर्थात एफडीआयमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन त्यांनी विरोधकांना खोचक टोलाही लगावला आहे. 'बोलायला नाही, कर्तृत्व दाखवयाला हिंमत लागते', असं त्यांनी म्हटलं आहे. (Maharashtra No 1 in Foreign Direct Investment Devendra Fadnavis shared DPIIT data)

फडणवीसांनी ट्विट करुन म्हटलं की, "एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक एकवर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीनं काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रानं गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे.

Maharashtra No 1 in FDI
Manoj Jarange: "'सगे-सोयरे' लागू करा अन्यथा विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार देणार"; मनोज जरांगेंची घोषणा

सन 2022-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात 1,18,422 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे तर 2023-24 या आर्थिक वर्षांत 1,25,101 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे.

Maharashtra No 1 in FDI
Rohit Sharma: 'हे खुल्या मैदानासारखं...' भारत-पाकिस्तान सामना होणाऱ्या न्युयॉर्कच्या नव्या स्टेडियमबद्दल रोहित काय म्हणाला?

महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे, असंही यामध्ये फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानताना त्यांनी डीपीआयआयटीने 30 मे 2024 रोजी जारी केलेल्या आकडेवारीचा तक्ताही शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.