स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; तब्बल १६ हजार १४५ मान्यताप्राप्त स्टार्टअपची नोंद

Startup Maharashtra: नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी, उद्योग, विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्‍ट्रात सुरू असलेले स्टार्टअप हे देशात अव्वल ठरत आहे. नोंदणीसाठी देशात तब्बल १८ टक्के तर, यशस्वी स्टार्टअपमध्ये राज्याचे एकूण २३ टक्के योगदान असल्याने राज्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
Maharashtra tops the country in startups
Maharashtra tops the country in startupsSakal
Updated on

मुंबई : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी, उद्योग, विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्‍ट्रात सुरू असलेले स्टार्टअप हे देशात अव्वल ठरत आहे. नोंदणीसाठी देशात तब्बल १८ टक्के तर, यशस्वी स्टार्टअपमध्ये राज्याचे एकूण २३ टक्के योगदान असल्याने राज्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. एक लाख ५४ हजार ४४१ हून अधिक रोजगार उपलब्ध झाला आहे.

राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-२०१८ हे सुरू असून त्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे.

आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे राज्यातील मान्यताप्राप्त १६ हजार १४५ स्टार्टअपची नोंद झाली. देशातील यशस्वी १०८ स्टार्टअप पैकी २५ स्टार्टअप हे महाराष्‍ट्रातील आहेत.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे स्टार्टअपबाबत मोठी जनजागृती होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४१ हजार ८२१ स्टार्टअपची नोंदणी झाली. पहिल्या रँकचा राजीव गांधी एक्सलन्स अवॉर्ड २०२१-२२, निती आयोगाकडून नॅशनल इनोव्हेशन इंडेक्सचा चौथ्या रँकचा पुरस्कारही राज्‍याला मिळाला आहे.

Maharashtra tops the country in startups
Apple: ॲपलने थांबवले AI टीमचे काम, 121 कर्मचार्‍यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

२०२५ पर्यंत युनिकॉर्नची संख्या १५० पेक्षा जास्त असेल

युनिकॉर्न स्टार्टअपच्या संख्येत अमेरिका आणि चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतातील युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या सध्या १००पेक्षा जास्त आहे. शिवाय हे प्रमाण वाढत आहे.

जेव्हा जेव्हा एखाद्या स्टार्टअपचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स (सुमारे 8,300 कोटी रुपये) पेक्षा जास्त होते तेव्हा त्याला युनिकॉर्न स्टार्टअप म्हणतात. २०२५ पर्यंत भारतातील युनिकॉर्न स्टार्टअप्सची संख्या १५०पेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे.

Maharashtra tops the country in startups
Artificial Intelligence : ‘एआय’चा ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम; आंतररराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकीत

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) नुसार, ३१ ऑक्टोबर २०२३पर्यंत देशात १,१४,९०२ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. असे ४७ टक्के स्टार्टअप्स आहेत जिथे किमान एक महिला संचालक आहे.

स्टार्टअप इंडिया उपक्रम १६ जानेवारी २०१६ रोजी देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला. गेल्या ६ वर्षांत भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम अधिक मजबूत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.