Maharashtra Budget 2024: महायुती सरकारने काल शुक्रवारी 6,12,293 कोटी रुपयांचा (सुमारे 73 अब्ज डॉलर) अर्थसंकल्प सादर केला. जो पाकिस्तानच्या अर्थसंकल्पापेक्षा (67.84 अब्ज डॉलर) आणि बांगलादेशच्या अर्थसंकल्पापेक्षा (68 अब्ज डॉलरपेक्षा) जास्त आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, ज्यांच्याकडे राज्याचे अर्थखातेही आहे, त्यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. पुढील चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या सत्ताधारी युतीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या. त्यांनी अर्थसंकल्पाद्वारे राज्याच्या लोकसंख्येतील प्रमुख घटकांना संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
उदाहरणार्थ, महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना तसेच शेतकऱ्यांना पीक विमा आणि वीज बिल माफीची घोषणा केली. त्यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील कर 24% वरून 21% पर्यंत कमी केला.
पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव
पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रूपये
‘निर्मल वारी’ साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार
सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी
दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
पिंक ई रिक्षा - 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - 80 कोटी रुपयांचा निधी
"शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये
‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ
लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, 2022 पासून 15 हजार 245 कोटी 76 लाख रूपयांची मदत
नोव्हेंबर - डिसेंबर, 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24 लाख 47 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 253 कोटी रुपयांची मदत
नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत
खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1 हजार 21महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.