वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी अदाणी विरुद्ध हिंडनबर्ग वादावर धक्कादायक खुलासे केले आहेत. महेश जेठमलानी यांनी त्यांच्या एक्सवरील थ्रेड नुसार अदानीला संपवण्यासाठी चीन का प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. त्याचे कारणे देखील जेठमलानी यांनी दिले आहेत. तसेच हिंडनबर्ग आणि अदाणी शेअर्सच्या विक्रीबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
महेश जेठमलानी यांनी मांडलेले मुख्य मुद्दे -
हिंडनबर्ग आणि किंग्डनच्या संबंधांबद्दल:
हिंडनबर्ग, एक संशोधन संस्था, अमेरिकन उद्योगपती मार्क किंग्डन यांनी अदाणी समूहावर अहवाल तयार करण्यासाठी नियुक्त केली होती. किंग्डनने चिनी महिलेशी लग्न केले आहे, जे अमेरिकेतील इतर शंकास्पद व्यावसायिकांप्रमाणेच आहे.
कोटकची भूमिका:
किंग्डनने कोटकच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक शाखा (KMIL) शी संपर्क साधून अदाणी शेअर्समध्ये व्यापार करण्यासाठी ऑफशोअर फंड आणि खाती स्थापन केली. यामुळे कोटक इंडिया अपॉर्च्युनिटी फंड (KIOF) अस्तित्वात आला, ज्यामुळे अदाणी प्रकरणात कोटकची भूमिका स्पष्ट होते.
अदाणी शेअर्समध्ये शॉर्ट पोजिशन:
हिंडनबर्ग अहवाल तयार होण्यापूर्वी, KIOF ने मॉरिशस मार्गाने अदाणी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर शॉर्ट पोजिशन घेतल्या. व्यापारासाठी ($40 दशलक्ष) निधी किंग्डनच्या मास्टर फंडातून प्रदान केला होता, ज्यामध्ये किंग्डन कुटुंबाचा मोठा हिस्सा आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी अनला चेंग, एक चिनी महिला, मुख्य भूमिकेत आहे.
अनला चेंगचे संबंध:
सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अनला चेंग, एक चीनी-अमेरिकन, यूएस मधील चिनी हितसंबंधांसाठी प्रभावी लॉबीस्ट आहे. ती SupChina या प्रो-चायना मीडिया कंपनीची सीईओ होती, नंतर या कंपनीचे नामकरण द चायना प्रोजेक्टमध्ये असे झाले. पुढे एका व्हिसलब्लोअरने जो चायना प्रोजेक्टचा कर्मचारी होता त्याने यूएस काँग्रेससमोर शपथेवर दिलेल्या साक्षीत, चीनच्या हितसंबंधांसाठी बातम्यांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला.
अदानीच्या व्यवसायावर चीनचा प्रयत्न का?-
अदाणी ने इस्रायलमधील हैफा पोर्टचा ताबा घेतला आहे आणि इजिप्तमधील एका ड्राय पोर्टवर नियंत्रण मिळवले आहे. अदाणीच्या बंदरांनी चीनच्या सागरी मार्गाला वेढा घातला आहे. ही बंदरे केवळ सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांसाठीच नव्हे तर विमानवाहू जहाजे आणि पाणबुड्यांसाठीही पार्किंगची ठिकाणे आहेत. हे चीनसाठी त्रासदायक आहे, असे महेश जेठमलानी म्हणाले.
जेठमलानी यांनी त्यांच्या मांडणीत म्हटले आहे की, चीन अदाणीवर हल्ला करून भारतीय नौदलाच्या विस्तारावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे चीनला मुक्त मार्ग मिळू शकतो. मोदी सरकारवर हल्ला करण्यासाठी भारतातील काँग्रेस आणि कम्युनिस्टांचा वापर करून चीन आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
(वरील सगळे दावे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी एक्सवर केले आहेत. Esakal याच्याशी सहमत आहे असे नाही)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.