Mahindra: टाटांच टेन्शन वाढलं! महिंद्रा लवकरच करणार स्कोडा सोबत मोठा करार; गुंतवणूकदार मालामाल होणार?

Mahindra Skoda To Make Joint Venture: देशातील एसयूव्ही सेगमेंटमधील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच कार कंपनी स्कोडा ऑटोसोबत मोठा करार करू शकते. स्कोडा ऑटो ही जर्मनीची आघाडीची कार कंपनी फोक्सवॅगनची उपकंपनी आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Mahindra Skoda To Make Joint Venture
Mahindra Skoda To Make Joint VentureSakal
Updated on

Mahindra Skoda To Make Joint Venture: देशातील एसयूव्ही सेगमेंटमधील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच कार कंपनी स्कोडा ऑटोसोबत मोठा करार करू शकते. स्कोडा ऑटो ही जर्मनीची आघाडीची कार कंपनी फोक्सवॅगनची उपकंपनी आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये कराराबाबत चर्चा सुरू आहे.

महिंद्रा ग्रुपने पुन्हा एकदा सांगितले की, कंपनी भारतातील जर्मनीच्या फोक्सवॅगन ग्रुप (VW ग्रुप) सोबत सहकार्य वाढवण्याच्या संधी शोधत आहे. या दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

M&M कडून हे स्पष्टीकरण अशा वेळी आले आहे जेव्हा एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की कंपनी फोक्सवॅगन समूहासोबत करार करण्याच्या जवळ आहे.

Mahindra Skoda To Make Joint Venture
Vodafone Idea: वोडाफोन-आयडियाला मोठा दणका! ग्राहकाला द्यावे लागणार 50 हजार रुपये; काय आहे प्रकरण?

महिंद्रा अँड महिंद्रा स्कोडा ऑटो इंडियामधील 50% भागभांडवल 800 दशलक्ष डॉलर ते 1 अब्ज डॉलरला खरेदी करु शकते. अहवालात असेही म्हटले आहे की स्कोडा ऑटोचे संचालक मंडळ भारतात आहे आणि लवकरच या कराराची घोषणा केली जाईल.

जुलैच्या सुरुवातीला, मनीकंट्रोलने या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देत अहवाल दिला होता की, महिंद्रा अँड महिंद्रा आणि JSW समूह स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियामधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहेत.

Mahindra Skoda To Make Joint Venture
JSW Group: सज्जन जिंदाल यांचा मोठा निर्णय! 40,000 कोटींचा ईव्ही प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवणार

Skoda Auto Volkswagen India ने FY23 मध्ये 309 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. गेल्या 5 वर्षातील हा त्यांचा सर्वाधिक नफा आहे. महिंद्रा अँड महिंद्राने 2022 मध्ये इलेक्ट्रिक घटकांच्या पुरवठ्यासाठी फॉक्सवॅगनसोबत करार केला होता.

तेव्हापासून, दोन्ही कंपन्या भारतातील ई-मोबिलिटीच्या क्षेत्रात विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी नवीन संधी शोधत आहेत. या दोन कंपन्यांच्या कराराचा फटका टाटा मोटर्सला बसण्याची शक्यता आहे. कारण भारतात टाटा आणि महिंद्रा यांच्यात मोठी स्पर्धा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.