Mumbai News : महिंद्र फायनान्सने आपल्या कर्ज प्रक्रियेत सुधारणा व ‘प्रोजेक्ट उडान’द्वारे डिजिटायजेशन केले असून, त्याद्वारे मालमत्तेचा दर्जाही सुधारला आहे, अशी माहिती महिंद्र फायनान्सचे मुख्य वित्तीय अधिकारी विवेक कर्वे यांनी ‘सकाळ’ला दिली.
महिंद्र फायनान्स ही महिंद्र आणि महिंद्रची उपकंपनी असून त्यांच्या बॅलन्सशीटचा आकार एक लाख कोटी रुपये एवढा आहे. महिंद्र आणि महिंद्रमार्फत विक्री होणाऱ्या गाड्यांच्या खरेदीसाठी कर्ज देण्यापासून सुरुवात करणाऱ्या महिंद्र फायनान्सचा हा व्यवसाय आता फक्त ४४ टक्के राहिला आहे.
व्यवसायात विविधता आणल्यामुळे आता ते एकूण कर्जापैकी ५६ टक्के कर्जे इतर कंपन्यांच्या गाड्यांच्या खरेदीसाठी देतात. देशातील सहा लाख गावांपैकी चार लाख गावांमध्ये त्यांचे ग्राहक आहेत. ९८ लाख व्यक्तींना आतापर्यंत कर्ज दिली असल्याचे कर्वे यांनी सांगितले.
कंपनीने आता कर्जासंदर्भातील प्रक्रिया कठोर केली असून कर्ज थकवण्याची शक्यता असलेल्यांना कर्ज दिली जात नाहीत. कर्जवसुलीची प्रणालीही डिजिटाइज्ड होत असून कर्ज नियमितपणे फेडणाऱ्यांना सवलत दिली जाते.
कर्ज थकव्यांवर कारवाईही सुरू केल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचा दर्जा आता भरपूर सुधारला आहे. सेकंड हॅन्ड गाडी खरेदीसाठीही कर्ज देण्याचा व्यवसाय वाढत असून सध्या कंपनीचा यातील वाटा १७ टक्के आहे, तो २० टक्के करण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविड काळात कंपनीचा नफा कमी झाला असला, तरी त्यांना सतत नफा होत आहे. गेल्या वर्षीचा त्यांचा नफा दोन हजार कोटी होता. आता याचबरोबर ‘फी’वर आधारित उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ- कर्ज घेणाऱ्याला आयुर्विमा किंवा जीवन विमा घ्यायला लावला जात असून, त्यातून कमिशन वाढविण्याचा प्रयत्न आहे.
- विवेक कर्वे, मुख्य वित्तीय अधिकारी, महिंद्र फायनान्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.