Zerodha Report : लहान शहरांमध्ये मोठे गुंतवणूकदार; म्युच्युअल फंडांत ५० टक्के हिस्सा, ‘झिरोधा’चा अहवाल

म्युच्युअल फंडांकडे वळणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांपैकी निम्मे गुंतवणूकदार लहान शहरांतील असून, दर महिन्याला त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
investors
investorssakal
Updated on

मुंबई : म्युच्युअल फंडांकडे वळणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांपैकी निम्मे गुंतवणूकदार लहान शहरांतील असून, दर महिन्याला त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्युच्युअल फंड उद्योगाने एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान २.३ कोटी फोलिओ जोडले आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक फोलिओ लहान शहरांतील गुंतवणूकदारांचे आहेत, असे ‘झिरोधा फंड हाउस’च्या अभ्यासातून समोर आले आहे.

या अभ्यासानुसार, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (एयूएम) एकूण मालमत्तेमध्ये लहान शहरांचा वाटा अजूनही केवळ १९ टक्के आहे. लहान शहरांमधील छोटे गुंतवणूकदार सरासरी १.१३ लाख रुपयांची गुंतवणूक करतात.

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लहान शहरांमधील लोकांची संख्या वाढली असली, तरीही त्यांची गुंतवणुकीची रक्कम मोठ्या शहरांमधील गुंतवणूकदारांच्या तुलनेत कमी आहे. त्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (अॅम्फी) ही लहान शहरे देशातील ‘बी-३०’ शहरे म्हणून वर्गीकृत केली आहेत.

गेल्या महिन्यातील आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांतील एकूण ‘एसआयपी’ खात्यांपैकी सुमारे ५४ टक्के योगदान लहान शहरांमधील गुंतवणूकदारांचे आहे. लहान शहरांमध्ये मोठ्या संख्येने ‘एसआयपी’ खाती आहेत. यावरून लहान शहरी भागातील गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येते, असे या अहवालात म्हटले आहे.

गेल्या पाच महिन्यांत, इंडेक्स फंडांसाठी लहान शहरांमधील ‘एसआयपी’ खात्यांमधील वाढीचा दर १९ टक्के असून, हा उद्योगातील इतर कोणत्याही श्रेणीच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. एकंदरीत, लहान शहरांमधील सुमारे ७९ टक्के ‘एसआयपी’ खाती इक्विटी आधारित म्युच्युअल फंड योजनांमध्ये योगदान देतात.

स्मार्टफोन ॲप, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म, डिजिटल पेमेंट सिस्टीम आणि या उद्योगक्षेत्राचा पुढाकार यामुळे लहान शहरांमधील सर्व नव्या गुंतवणूकदारांपैकी ५० टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदार थेट योजनांद्वारे गुंतवणूक करत आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुलभ, पारदर्शक आणि परवडणाऱ्या योजना लहान गुंतवणूकदारांना चांगले आर्थिक भविष्य तयार करण्यास मदत करतील. निर्देशांक-आधारित योजनांमध्ये ही क्षमता असल्याने म्युच्युअल फंडाकडे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होत आहेत.

- विशाल जैन, सीईओ, झिरोधा फंड हाउस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.