MDH And Everest Spices Ban: भारतातील प्रसिद्ध ब्रँड MDHच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यापूर्वी सिंगापूर आणि हाँगकाँगने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी घातली होती. आता मालदीवनेही या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
या उत्पादनांमध्ये कीटकनाशकांची भेसळ असल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे. मात्र एमडीएचने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाचे म्हणणे आहे की या भारतीय ब्रँडमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळले आहे.
जगप्रसिद्ध मसाला ब्रँड MDH ने आपल्या उत्पादनात कीटकनाशके असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे दावे खोटे आणि निराधार असून त्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. आमच्या उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड असल्याचा आरोप खोटा आहे.
त्याच वेळी, सिंगापूर आणि हाँगकाँगच्या नियामक अधिकाऱ्यांनी कंपनीला कोणताही कॉल केला नाही. अशा स्थितीत कंपनीचे आरोप बिनबुडाचे आणि सिद्ध न झालेले आहेत.
आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देतो की इथिलीन ऑक्साईडचा वापर मसाल्यांची साठवणूक, प्रक्रिया किंवा पॅकेजिंगच्या कोणत्याही टप्प्यावर केला जात नाही. आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे पालन करतो.
एव्हरेस्ट आणि एमडीएच उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आढळल्यानंतर सिंगापूर आणि हाँगकाँगने काही मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तेव्हापासून या उत्पादनांची अमेरिका आणि भारतात चाचणी सुरू आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही मसाल्यांची माहिती घेत आहोत. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कर्करोगाचा धोका असतो.
आता एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या विक्रीवर मालदीवमध्येही बंदी घालण्यात आली आहे. मालदीवच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाचे म्हणणे आहे की या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळले आहे. आता मालदीव सरकार या मसाल्यांच्या धोक्याची चाचणी करत आहे.
एमडीएचच्या तीन मसाल्यांच्या ब्रँड आणि एव्हरेस्टच्या एका ब्रँडच्या विक्रीवर तीन देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यापैकी MDHच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर आणि एव्हरेस्टच्या फिश करी मसालावर बंदी घालण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.