Indian RuPay Card: भारताचे रुपे कार्ड लवकरच मालदीवमध्ये होणार लॉन्च; मंत्री मोहम्मद सईद यांनी केली घोषणा

Indian RuPay Card: भारताचे रुपे कार्ड लवकरच मालदीवमध्ये लॉन्च होणार आहे. यामुळे मालदीवच्या चलनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मालदीव आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध ताणले असताना हे पाऊल उचलले जात आहे.
Indian RuPay Card
Indian RuPay CardSakal
Updated on

Indian RuPay Card: भारताचे रुपे कार्ड लवकरच मालदीवमध्ये लॉन्च होणार आहे. यामुळे मालदीवच्या चलनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मालदीव आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध ताणले असताना हे पाऊल उचलले जात आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून RuPay हे भारतातील जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेले पहिले कार्ड आहे. एटीएममध्ये, वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर पेमेंट करण्यासाठी या कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारताची RuPay सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आणि चीनने द्विपक्षीय व्यापारात स्थानिक चलन वापरण्याचे मान्य केले आहे. सईदने बुधवारी राज्य वृत्तवाहिनी 'पीएसएम न्यूज'ला सांगितले की, भारताची रुपे सेवा सुरू केल्याने मालदीवियन रुफिया (एमव्हीआर) ला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Indian RuPay Card
RBI Gold Reserve: चार महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी; आरबीआय इतके सोने का खरेदी करत आहे?

डॉलरच्या समस्येवर तोडगा काढणे आणि स्थानिक चलन मजबूत करणे हे सध्याच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, RuPay सेवा सुरू करण्याची कोणतीही तारीख त्यांनी जाहीर केली नाही.

CorporateMaldives.com या न्यूज पोर्टलने गेल्या आठवड्यात सईद यांच्या हवाल्याने म्हटले होते की, हे कार्ड मालदीवमध्ये रुपयाच्या व्यवहारासाठी वापरले जाईल. सईद यांनी सांगितले की, आम्ही सध्या रुपयांमध्ये व्यवहार सुलभ करण्याचे मार्ग शोधण्यासाठी भारताशी चर्चा करत आहोत.

भारतासोबतच्या वाढत्या तणावाचा मालदीवच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे. चार महिन्यांत मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. या कालावधीत पर्यटकांची संख्या 42 टक्क्यांनी घटली आहे. पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यानंतर मालदीवनेही भारतीय पर्यटकांना येण्याचे आवाहन केले आहे.

Indian RuPay Card
Silver Price Hike: चांदीच्या भावात विक्रमी वाढ का झाली? गेल्या 3 महिन्यांत किंमत 30 टक्के पेक्षा जास्त वाढली

पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी दोन्ही देशांमधील संबंधांवर भर देत भारतासोबत काम करण्याबाबत बोलले होते. आपली अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 42,638 भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.