Maruti Suzuki: मारुती सुझुकीला मोठा धक्का! GSTने पाठवली 139 कोटींची नोटीस, काय आहे कारण?

Maruti Suzuki: काल शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली
Maruti Suzuki
Maruti Suzukisakal
Updated on

Maruti Suzuki: काल शेअर बाजार बंद झाल्यानंतर, ऑटो कंपनी मारुती सुझुकीने एक्सचेंजला पाठवलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, त्यांना जीएसटीची 139 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, मारुतीला जीएसटीकडून ही नोटीस मिळाली आहे. ही नोटीस जुलै 2017 ते ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी आहे.

जीएसटीने जारी केलेल्या नोटीसमध्ये त्यांना व्याज आणि दंडासह 139 कोटी रुपयांचा कर भरावा लागेल, असे म्हटले आहे. कंपनीने आधीच जीएसटी भरला आहे. मात्र, ही नोटीस काही सेवांबाबत रिव्हर्स चार्ज बेसवर आधारित आहे. कंपनी या नोटीसला योग्य प्रतिसाद देईल. असे कंपनीने म्हणले आहे.

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात मारुतीचा शेअर 10,610 रुपयांवर बंद झाला. हा शेअर एका महिन्यात 10.3 टक्के, तीन महिन्यांत 11 टक्के, यावर्षी आतापर्यंत 26 टक्के आणि तीन वर्षांत 57 टक्के वाढला आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 10,610 रुपयांवर बंद झाला.

Maruti Suzuki
Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का; 'ही' कंपनी अदानी ग्रुपमधील हिस्सेदारी विकणार, काय आहे प्रकरण?

एलआयसीलाही मिळाली नोटीस

भारतीय आयुर्विमा महामंडळालाही 290 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. एलआयसीवर असा आरोप आहे की एलआयसीने पॉलिसीधारकांकडून घेतलेल्या विमा पॉलिसी प्रीमियमवर कमिशन वसूल केले, परंतु त्यांनी जीएसटी भरला नाही.

Maruti Suzuki
TCS Company: टीसीएस कंपनीचा कर्मचाऱ्यांना झटका! 1 ऑक्टोबरपासून होणार...

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. LIC ला बिहार GST कडून मिळालेल्या नोटिसवर 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या GST कौन्सिलच्या 52 व्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()