Gold Price Today, 13 March 2023 : सोन्या-चांदीचे भाव आज तेजीत आहेत. सोने 56,500 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. जागतिक मागणीचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून येत आहे.
देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मौल्यवान धातूंच्या किंमती वाढत आहेत. आज जर तुम्ही सराफ बाजारात सोने खरेदीसाठी बाहेर गेला असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल.
काय आहेत सोन्याचे भाव :
आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्यात चांगली वाढ झाली आहे आणि तो 56,500 रुपयांच्या पुढे गेला आहे. एमसीएक्सवर सोने 365 रुपये किंवा 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 56,515 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते.
सोन्याची सर्वोच्च पातळी पाहिली तर आज त्यात 56,667 रुपये प्रति 10 ग्रॅमचा दर होता. दुसरीकडे, आजची नीचांकी पातळी पाहता सोन्याचा दर 56,412 रुपयांवर गेला होता.
चांदीचे भाव :
चमकदार धातू चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे आणि 645 रुपये किंवा 1.03 टक्क्यांच्या वाढीसह 63,535 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे. चांदीचा भाव खालच्या बाजूला 63,531 रुपये प्रति किलो तर वरच्या बाजूला 63,749 रुपये प्रति किलो होता.
जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव :
चेन्नई - 58,090 रुपये
दिल्ली - 57,370 रुपये
हैदराबाद - 57,220 रुपये
कोलकत्ता - 57,220 रुपये
लखनऊ - 57,370 रुपये
मुंबई - 57,220 रुपये
पुणे - 57,220 रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.