Medical Treatment Expense: एक तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. तसेच कोविड काळापासून रुग्णालयातील उपचारही महाग झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचारांवर होणारा खर्च दुपटीने वाढला आहे.
संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत. एकीकडे महागाई दर 7 टक्क्यांच्या आसपास असताना वैद्यकीय महागाई 14 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे.
पाच वर्षांत उपचारावरील खर्च झाला दुप्पट
पॉलिसीबाजारच्या डेटाचा हवाला देऊन TOI अहवालात असे सांगण्यात आले आहे की, संसर्गजन्य रोगांच्या उपचारांसाठी 2018 मध्ये सरासरी वैद्यकीय विमा दावा 24,569 रुपये होता.
जो 2022 मध्ये वाढून 64,135 रुपये झाला आहे. म्हणजेच 5 वर्षात या आजारावरील उपचारावरील खर्च 160 टक्के महाग झाला आहे. मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पाच वर्षांत हा खर्च 30,000 रुपयांवरून 80,000 रुपयांपर्यंत वाढला आहे.
दरवर्षी 18 टक्के दराने खर्च वाढत आहे
श्वसनविकार आजारांवर उपचारासाठी सरासरी दावा 2022 मध्ये 94,245 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो 2018 मध्ये 48,452 रुपये होता, याचा अर्थ वार्षिक उपचार 18 टक्के दराने महाग झाला आहे. मुंबईत हा खर्च 80,000 रुपयांवरून 1.70 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.
कोरोनानंतर उपचार महाग झाले
कोरोनानंतर वैद्यकीय उपचारावरील खर्चात वाढ झाली आहे. उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यावरचा खर्चही वाढला आहे. पूर्वी या साहित्याचा एकूण बिलात हिस्सा 3 ते 4 टक्के असायचा, तो आता 15 टक्के झाला आहे.
वैद्यकीय महागाई इतर महागाईच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. 7 टक्के महागाई दर आहे पण वैद्यकीय महागाई दुप्पट दराने वाढत आहे. आरोग्य विम्याची मागणी वाढल्याने उपचारही महाग झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.