Meesho Announces 9-Day Leave: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने कर्मचाऱ्यांसाठी 9 दिवसांचा ब्रेक जाहीर केला आहे. हा ब्रेक 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत असेल. या ब्रेकला 'रीसेट आणि रिचार्ज' असे नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर लोक कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.
लोक म्हणत आहेत की, कंपनीने उद्योग क्षेत्रात एक चांगले उदाहरण ठेवले आहे. मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांना अशी सुट्टी देण्याचे हे चौथे वर्ष आहे. या ब्रेक दरम्यान कर्मचाऱ्यांना कामासंबंधात कोणताही फोन येत नाही.
मीशोने लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये लिहिले, कोणताही लॅपटॉप नाही, मेसेज नाहीत, ईमेल नाहीत, मीटिंग नाहीत आणि स्टँड-अप कॉल नाहीत, 9 दिवस काहीही काम नाही! 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आम्ही आमच्या चौथ्या 'रीसेट आणि रिचार्ज' ब्रेकवर जात आहोत.
मीशोसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले जात आहे. कंपनीचा मेगा ब्लॉकबस्टर सेल प्रचंड यशस्वी झाला. अशा परिस्थितीत, कंपनीला आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कामातून ब्रेक घ्यावा आणि ताजेतवाने परत कामावर यावे असे वाटते.
कंपनीने म्हटले की, या वर्षाच्या सर्व कठोर परिश्रमानंतर आणि आमच्या यशस्वी मेगा ब्लॉकबस्टर विक्रीनंतर, आता स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. हा ब्रेक आपल्याला आपले मन आणि शरीर ताजेतवाने करण्यासाठी आहे, जेणेकरून आपण नवीन उर्जेने पुढील वर्षाची सुरुवात करू शकू.
सोशल मीडिया यूजर्सनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले की, सर्व कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांचा ब्रेक देण्याच्या निर्णयाचे मी कौतुक करतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या कामाच्या चक्रात अडकणे आणि ब्रेक घेण्याचे महत्त्व विसरणे खूप सोपे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांचा ब्रेक देण्याच्या निर्णयावरून असे दिसून येते की मीशो आपल्या कर्मचाऱ्यांची कदर करते.
आणखी एका युजरने लिहिले, सध्या सर्व उद्योगांमध्ये ज्या प्रकारचे वर्क कल्चर आहे ते पाहता मी याची कल्पनाही करू शकत नाही. अविश्वसनीय, मीशो. तुम्ही लोकांनी एक उदाहरण ठेवले आहे. आजकाल वर्क-लाइफ बॅलन्सवर खूप भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत लोक मीशोच्या 'रीसेट अँड रिचार्ज' निर्णयाचे स्वागत करत आहेत.
सोशल मीडियावर लोक इतर कंपन्यांनाही मीशोकडून प्रेरणा घेण्याची विनंती करत आहेत. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीपेक्षा अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि त्यांना विश्रांतीची संधी देखील दिली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.