Sucess Story: कोण आहे भारतातला सर्वात तरुण अब्जाधीश? टॅक्सीच्या वाईट अनुभवानंतर उभारली करोडोंची कंपनी

2010 मध्ये त्यांनी त्यांचा मित्र भाविश अग्रवाल यांच्यासोबत कंपनीची पायाभरणी केली होती.
Sucess Story
Sucess StorySakal
Updated on

Sucess Story: देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप कंपन्यांपैकी एक असलेल्या अंकित भाटीची ही गोष्ट आहे. भाटी हे आयआयटीचे माजी विद्यार्थी, लोकप्रिय राइड-शेअरिंग अॅप ओलाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

2010 मध्ये त्यांनी त्यांचा मित्र भाविश अग्रवाल यांच्यासोबत या कंपनीची पायाभरणी केली होती. यांनी देशात कॅब सेवेचे अनोखे मॉडेल उभे केले. या आधी या मॉडेलचा कोणीही विचार केला नव्हता. टॅक्सीच्या वाईट अनुभवानंतर त्यांनी या कंपनीची स्थापन केली.

अंकित भाटी हे ओला या भारतातील राइड-शेअरिंग आणि कॅब सेवा कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत, जी Uber कंपनीची स्पर्धक आहे. अंकित हा त्याच्या सह-संस्थापक भाविश अग्रवालप्रमाणेच IIT बॉम्बेचा पदवीधर आहे.

अंकित भाटी हे ओला कॅबचे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेचे पदवीधर आहेत. अंकित भाटी हे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर असून ते कोडिंगमध्ये तज्ञ आहेत.

राइड-शेअरिंग अॅपची स्थापना करण्यापूर्वी, अंकित भाटी यांनी मायक्रोसॉफ्ट, मेक सेन्स आणि विल्कॉम सारख्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले.

Ola Cabs ची स्थापना अंकित भाटी आणि त्यांचे IIT बॉम्बेचे बॅचमेट भाविश अग्रवाल यांनी केली होती. भावीश हे ओलाचे सीईओ असताना, अंकितने राइड-शेअरिंग ऍप्लिकेशनची तांत्रिक बाजू संभाळली आणि ओला कॅब्सचे मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) पद स्वीकारले.

2010 मध्ये स्थापन झालेल्या, Ola Cabs ने लवकरच टेकऑफ केले आणि 2015 मध्ये अंकित भाटी आणि भाविश अग्रवाल या दोघांना भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये स्थान मिळाले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुमारे आठ वर्षांपूर्वी अंकित भाटी यांची एकूण संपत्ती 3,000 कोटी रुपये होती.

Sucess Story
Bank Holiday in July 2023: जुलै महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, ‘इतके' दिवस बँका राहणार बंद! गैरसोय टाळण्यासाठी पाहा यादी

हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार अंकित भाटी लवकरच देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक बनले. दरम्यान, मूळ कंपनी ANI Technologies मध्ये 3,000 हून अधिक कर्मचारी काम करत असून, Ola Cabs ची एकूण कमाई 938 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

देशातील सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी एक असल्याने, अंकित भाटी आणि भाविश अग्रवाल ओला कॅब्ससह नवीन उंची गाठत आहेत, त्यांचे उत्पन्न काही वर्षांत रु. 1000 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Sucess Story
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.