Who is Indian origin CEO Nikesh Arora: भारतीय वंशाचे सीईओ निकेश अरोरा यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. निकेश अरोरा 151.43 दशलक्ष डॉलर (सुमारे 1,257 कोटी रुपये) च्या कमाईसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.
निकेश अरोरा यांची कमाई अनेक सीईओंच्या तुलनेत खूप जास्त आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेतील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंची यादी जाहीर केली आहे.
अहवालानुसार, सायबर सिक्युरिटी कंपनी पालो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोरा हे ब्रॉडकॉमचे सीईओ हॉक टॅन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत. झुकरबर्गची कमाई 24.40 दशलक्ष डॉलर (सुमारे 202.52 कोटी) आणि पिचाईची कमाई 8.8 दशलक्ष डॉलर (सुमारे 73.04 कोटी रुपये) आहे.
पालो अल्टो नेटवर्क्सचे भारतीय वंशाचे CEO निकेश अरोरा यांनी IIT-BHU मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech.) पदवी प्राप्त केली आहे. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या एअरफोर्स पब्लिक स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
पालो अल्टो नेटवर्क्समधील कार्यकाळापूर्वीच, अरोरा यांनी गुगल आणि सॉफ्टबँक सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून तंत्रज्ञानाच्या जगात स्वत:चे नाव कमावले होते. 2012 मध्ये जेव्हा कंपनीने त्यांना 51 दशलक्ष डॉलर किमतीच्या पॅकेजवर नियुक्त केले तेव्हा अरोरा Google मधील सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी बनले.
सॉफ्टबँक ग्रुपमधील त्यांच्या कार्यकाळात, अरोरा यांनी जपानमध्ये 135 दशलक्ष डॉलरच्या पहिल्या वर्षाच्या पॅकेजसह नवीन विक्रम प्रस्थापित केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.