Meta Plans: फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन

Meta Plans For Businesses: फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करून अधिक सुविधा मिळवू शकता. Meta Platforms ने भारतीय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे.
Meta Plans
Meta Plans For BusinessesSakal
Updated on

Meta Plans For Businesses: फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करून अधिक सुविधा मिळवू शकता. Meta Platforms ने भारतीय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे. Meta Verified Plans मासिक 639 रुपयांपासून ते 21,000 रुपयांपर्यंत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या या प्लॅन्सवर सूट देण्यात येत आहे. तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी या योजना खूप उपयुक्त ठरू शकतात.

कंपनीने गेल्या वर्षी व्यवसायासाठी Meta Verified सुरू केले होते. या पायलट प्रोजेक्टद्वारे, कंपनीला हे जाणून घ्यायचे होते की लोक फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकतात.

2024 च्या सुरुवातीला, Meta ने 4 सबस्क्रिप्शन योजना लॉन्च करण्याची घोषणा केली होती. आता नवीन मेटा व्हेरिफाईड प्लॅन सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नवीन योजनांमध्ये, तुम्हाला Facebook आणि Instagram वर नवीन सुविधा मिळणार आहेत.

Meta Plans
Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर कसा असतो शेअर बाजार? गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

बाजारातून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे कंपनीने हे सबस्क्रिप्शन प्लॅन तयार केले आहेत. व्यावसायिकांनी मेटाला सांगितले की व्हेरिफाईड केल्याने त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवणे हा मेटा व्हेरिफाईडचा सर्वात मोठा फायदा असल्याचे बहुतांश व्यावसायिकांनी म्हटले आहे. त्याच्या मदतीने, ते त्यांच्या ब्रँडची विश्वासार्हता निर्माण करू शकतात आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ते वेगाने वाढवू शकतात.

Meta Plans
Budget 2024: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

सध्या मेटाचा हा सबस्क्रिप्शन प्लॅन आयओएस किंवा अँड्रॉइडच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मेटाने ग्राहकांना अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

तुम्ही मेटा एजंटशी चॅट किंवा ईमेलद्वारे कधीही माहिती मिळवू शकता. याशिवाय, तुम्हाला रील बनवण्यासाठी अनेक नवीन पर्याय देखील मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com