Satya Nadella: सत्या नडेला यांना दिवाळी आधी मायक्रोसॉफ्टने दिली बंपर पगारवाढ ; कमावतात 6,70,02,44,232 रुपये

Microsoft CEO Satya Nadella Compensation: मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली आहे. 2024 मध्ये, सत्या नडेला यांना एकूण पगार आणि भत्त्यांसह 79.1 दशलक्ष डॉलर्स (670 कोटी रुपये) मिळतील.
Microsoft CEO Satya Nadella
Microsoft CEO Satya NadellaSakal
Updated on

Satya Nadella Net Worth: मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली आहे. 2024 मध्ये, सत्या नडेला यांना एकूण पगार आणि भत्त्यांसह 79.1 दशलक्ष डॉलर्स (670 कोटी रुपये) मिळतील. सत्या नडेला यांचा पगार 2023 च्या तुलनेत 63 टक्के अधिक आहे. 2014 नंतर ही पहिलीच वेळ आहे की सत्या नडेला यांना 79.1 दशलक्ष डॉलर्स पगार दिला जाईल.

सत्या नडेला यांच्या पगारात वाढ झाल्याची माहिती गुरुवारी नियामक फाइलिंगद्वारे समोर आली आहे. नडेला यांच्या पगाराचा एक मोठा भाग परफॉर्मन्स बेस्ड स्टॉक अवॉर्ड्समधून येतो, ज्याचे मूल्य 2024 मध्ये 71.2 दशलक्ष डॉलर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.