Kiren Rijiju : मोदींच्या मंत्रिमंडळात उलथापालथ, बिहारमध्ये डावलल्यामुळे मंत्र्याचा राजीनामा, किरेन रिजिजू यांच्याकडे नवी जबाबदारी

पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (ता. २०) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. या खात्याचा कार्यभार असणारे मंत्री पशुपती पारस यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता.
Minister of Food Processing Industries to Kiren Rijiju
Minister of Food Processing Industries to Kiren RijijuSakal
Updated on

नवी दिल्ली : पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (ता. २०) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. या खात्याचा कार्यभार असणारे मंत्री पशुपती पारस यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिजिजू यांना याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही प्रत्येक क्षण काम करू. २०४७ मध्ये त्यांचे विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करू, असे रिजिजू म्हणाले.

Minister of Food Processing Industries to Kiren Rijiju
Solar waste : सौर कचरा ६०० किलो टन; सर्वाधिक प्रमाण राजस्थानमध्ये, ‘सीईईडब्ल्यू’चा अभ्यास

मी औपचारिकपणे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर मंत्रालयातील सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पशुपती पारस यांनी मंगळवारी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात डावलल्यामुळे पशुपती पारस नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.