Mobile Bill: जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत; किती वाढणार बिल?

Mobile Bill: स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर टेलिकॉम कंपन्या आता दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. तज्ञांच्या मते, जुलैपासून दर 15 ते 20% वाढू शकतात, ज्यामुळे मोबाईल वापरणे महाग होईल.
Mobile Bill
Mobile BillSakal
Updated on

Mobile Bill: स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर टेलिकॉम कंपन्या आता दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. तज्ञांच्या मते, जुलैपासून दर 15 ते 20% वाढू शकतात, ज्यामुळे मोबाईल वापरणे महाग होईल. ही वाढ प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारांमध्ये होईल. लिलावात कंपन्यांनी 11,340 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता तो खर्च वसूल करण्याची तयारी कंपन्या करत आहेत.

कंपनीच्या शेअर्सवर परिणाम दिसू शकतो

ॲक्सिस कॅपिटलचे कार्यकारी संचालक गौरव मल्होत्रा ​​सांगतात की, दूरसंचार कंपन्यांच्या टॅरिफ दरात वाढ झाल्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येईल. त्यांच्या मते, आगामी काळात भारती एअरटेलचे शेअर्स 1534 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतात. रिलायन्सच्या शेअर्समध्येही अशीच स्थिती दिसून येईल. लवकरच कंपनीचा शेअर 3512 रुपयांच्या लक्ष्य किंमतीला स्पर्श करताना दिसेल.

Mobile Bill
Rule Change: 1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

सरकारने स्पेक्ट्रम लिलावातून एवढी कमाई केली

सरकारने स्पेक्ट्रम लिलावासाठी राखीव किंमत 96,238 कोटी रुपये ठेवली होती, परंतु दुसऱ्या दिवशी लिलाव संपेपर्यंत सरकारला केवळ 11,340.78 कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. तिन्ही दूरसंचार कंपन्यांनी केवळ 141.4 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. मोबाइल स्पेक्ट्रमचा लिलाव मंगळवारी सुरू झाला.

दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी 10 वाजता लिलाव सुरू झाला, तो अवघ्या काही तासांतच संपला. या दोन दिवसांच्या लिलाव प्रक्रियेत स्पेक्ट्रम खरेदी करण्यात भारती एअरटेल आघाडीवर राहिली. एकूण 6,856.76 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले.

Mobile Bill
Inequality India: भारतात 85 टक्के अब्जाधीश उच्च जातीतील; अनुसूचित जमातीतील एकही व्यक्ती नाही, काय आहे अहवालात?

तर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने 973.62 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली. तर व्होडाफोन आयडियाने सुमारे 3,510.4 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. या स्पेक्ट्रम लिलावातून एकूण 11,340.78 कोटी रुपये सरकारच्या खात्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.