मोदी सरकार BOIसह 6 सरकारी बँकांमधील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

Bank Disinvestment: मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 5-10% हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.
Modi Government considering to offload 5 to 10 per cent stake in some public sector banks
Modi Government considering to offload 5 to 10 per cent stake in some public sector banks Sakal
Updated on

Bank Disinvestment: सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांची निर्गुंतवणूक होऊ शकते. केंद्र सरकार अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 5-10% हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात येत आहे.

सरकार या बँकांमधील हिस्सेदारी विकू शकते

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, भविष्यात मोदी सरकार 80% पेक्षा जास्त इक्विटी असलेल्या 6 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 10% पर्यंत हिस्सा विकू शकते. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकार लवकरच या बँकांमधील हिस्सा विकण्यासाठी विस्तृत रोडमॅप तयार करणार आहे.

Modi Government considering to offload 5 to 10 per cent stake in some public sector banks
Stock Market Holiday: आज शेअर बाजार राहणार बंद, काय आहे कारण?

बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि UCO बँकेत सरकारी मालकी 80% पेक्षा जास्त आहे. म्हणजे सरकार या बँकांमधील आपली हिस्सेदारी विकू शकते.

Modi Government considering to offload 5 to 10 per cent stake in some public sector banks
Tata Steel Layoff: टाटा स्टीलचा मोठा निर्णय; कंपनी 800 कर्मचार्‍यांना देणार नारळ, काय आहे कारण?

सरकार हा हिस्सा ऑफर फॉर सेलद्वारे विकू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरच्या किंमतीत झालेल्या वाढीचा फायदा घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चांगल्या कामगिरीसोबतच सरकारी बँकांनी बुडीत कर्जेही कमी केली आहेत, त्यामुळे त्यांचे शेअर्स वाढताना दिसत आहेत.

निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकातील 6.9% वाढीच्या तुलनेत निफ्टी PSU बँक निर्देशांक गेल्या वर्षी 34% वाढला आहे. सोमवारी, निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 2.64% वाढला, तर निफ्टी 50 82 अंक किंवा 0.42% घसरून 19,443.55 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.