Ethanol Production: उसापासून इथेनॉल बनवण्यावर सरकारने घातली बंदी; काय आहे कारण?

Ethanol Production: सरकारने मोठी घोषणा करत उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionSakal
Updated on

Ethanol Production: सरकारने मोठी घोषणा करत उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. भारतात कमी पावसामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. इथेनॉलचे उत्पादन सुरू राहिल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 2023-24 मध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात 2024-25 ची शेती अजून सुरू झालेली नाही.

महाराष्ट्रात कमी पाणी असल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात 8% घसरण झाल्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी 337 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

भारत सरकार साखरेपासून इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येऊ लागल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भावी दर सुमारे 8 टक्क्यांनी घसरले. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे.

Ethanol Production
Adani Group: गौतम अदानी विकत घेणार आणखी एक पोर्ट? 'इतक्या' कोटींना होणार डील

सरकारच्या या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बलराम चिनी 6.60 टक्के, दालमिया भारत 6.08 टक्के, बजाज हिंदुस्थान 5.41 टक्के, डीसीएम श्रीराम 5.80 टक्के घसरणीसह बंद झाले.

Ethanol Production
Dunzo Crisis: डन्झो कंपनी आर्थिक संकटात! कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साखर महागण्याची भीती आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात साखरेच्या पुरेशा उपलब्धतेवर सरकारचे लक्ष आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने गेल्या महिन्यात सांगितले की 2023/24 वर्षात साखर उत्पादन 8 टक्क्यांनी घसरून 33.7 दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.