Adani Group: गौतम अदानींना मोठा झटका! मोदी सरकार पुन्हा अदानींची चौकशी सुरू करणार?

Gautam Adani Coal Import: हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गौतम अदानींवर आरोप
Modi Government looking to restart probe into Adani Group's coal imports case Report
Modi Government looking to restart probe into Adani Group's coal imports case Report Sakal
Updated on

Gautam Adani Coal Import: गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार गौतम अदानी समूहाच्या कोळसा आयात प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करू शकते. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारताच्या तपास यंत्रणा गौतम अदानी समूहाच्या कोळशाच्या आयातीच्या किंमती वाढवल्याच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करू शकतात. सिंगापूरमधून यासंदर्भातील कागदपत्रे गोळा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Modi Government looking to restart probe into Adani Group's coal imports case Report
RBIचा एक निर्णय अन् बँकांच्या शेअर्समध्ये 10 टक्के घसरण; बजाज फायनान्सचे सर्वाधिक नुकसान

गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांवर आयात कोळशाच्या किंमती वर्षानुवर्षे वाढवून गुजरात आणि महाराष्ट्रातील वीज कंपन्यांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालयाने 2016 पासून अदानी समूह आणि सिंगापूर प्रशासन यांच्यातील व्यवहारांची कागदपत्रे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता.

भारत आणि सिंगापूरमध्ये ही कागदपत्रे उघड न करण्यासंबंधीची लढाई अदानी एंटरप्रायझेस आणि त्याच्या संलग्न कंपन्यांनी जिंकली होती. गौतम अदानी समूहाने म्हटले आहे की या प्रकरणात कोणतीही अनियमितता नाही आणि भारतीय अधिकाऱ्यांनी बंदरातून कोळशाच्या शिपमेंटचे आणि त्याच्या किंमतीचे मूल्यांकन केले होते.

Modi Government looking to restart probe into Adani Group's coal imports case Report
Adani Group: अदानी समूह आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी करणार? काय आहे प्लॅन

अदानी पॉवरवर आरोप

इंडोनेशियातील कोळशाच्या किंमतीपेक्षा जास्त दराने कोळसा आयात केल्याची माहिती अदानी पॉवरने दिल्याचा आरोपही गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडने केला होता. अदानी पॉवर कंपनी इंडोनेशियाहून कोळसा खरेदी करत होती आणि ग्राहकांना जादा दराने विकत होती. त्या तुलनेत कोळशाचा बाजारभाव खूपच कमी होता. असा आरोप अदानी पॉवर कंपनीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.