Rs 500 Notes Worth ₹88032.5 Cr Missing: सरकारने 500 रुपयांच्या 8810.65 दशलक्ष नोटा छापल्या होत्या, पण रिझर्व्ह बँकेकडे फक्त 7,260 दशलक्ष नोटा पोहोचल्याचं आरटीआयमध्ये उघड झालं आहे. सुमारे 1,550 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्या नाहीत.
एप्रिल 2015 ते मार्च 2016 दरम्यान, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसद्वारे 500 रुपयांच्या 210 दशलक्ष नोटा छापण्यात आल्या, त्या रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्या नाहीत.
सुमारे 1760 दशलक्ष म्हणजेच 176 कोटी 500 रुपयांच्या या सर्व नोटा गायब झाल्या आहेत का? या नोटांची किंमत काढली तर ती सुमारे 88 हजार कोटी रुपये आहे.
Free Press Journaच्या रिपोर्ट्सनुसार, आरटीआयद्वारे कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की करन्सी नोट प्रेस, नाशिकने 2015 ते मार्च 2016 दरम्यान 500 रुपयांच्या सुमारे 375.450 दशलक्ष नोटा छापल्या होत्या. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोंदीनुसार फक्त 345 दशलक्ष नोटा पोहोचल्याचं दिसून येतं.
गेल्या महिन्यात, करन्सी नोट प्रेस, नाशिकने आणखी एका आरटीआयला उत्तर देताना सांगितले होते की, रघुराम राजन गव्हर्नर असताना एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीत 210 दशलक्ष रुपयांच्या 500 नोटा छापून रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आल्या होत्या.
करन्सी नोट प्रेस, नाशिकच्या अहवालावरून असे दिसून येते की, सेंट्रल बँकेला 500 रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा करण्यात आला होता, परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात 500 रुपयांच्या नव्या नोटा मिळाल्याची माहिती उपलब्ध नाही.
म्हणजे 210 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटाही रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या नाहीत. झी बिझनेसने रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
भारतात 3 सरकारी छापखाने आहेत, जिथे चलनी नोटा छापल्या जातात. पहिली भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड आहे, जी बंगळुरूमध्ये आहे.
दुसरी करन्सी नोट प्रेस, जी नाशिकमध्ये आहे आणि तिसरी बँक नोट प्रेस आहे, जी देवासमध्ये आहे. चलनी नोटा येथे छापल्या जातात आणि नंतर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवल्या जातात.
अजित पवार यांची सरकारवर टिका:
केंद्र सरकारच्या नाशिक, देवास आणि बंगळुरू येथील चलन छापखान्यातून छापण्यात आलेल्या 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
2016 मध्ये चलन कारखान्यात नोटा छापल्या गेल्या, पण त्या सरकारच्या तिजोरीत पोहोचल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.