Most Expensive City: जगातलं सर्वात महागडं अन् स्वस्त शहर कोणतं माहितीये? आपल्या मुंबईचा नंबर कितवा?

Most Expensive City In The world: गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे.
Most Expensive City
Most Expensive CitySakal
Updated on

Most Expensive City In The world: जगातील सर्वात जास्त घरभाडे कुठे आहे हे तुम्हाला माहितं आहे का? याचे उत्तर न्यूयॉर्क आहे. न्यूयॉर्कमध्ये एका बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी मासिक भाडे 3,789 डॉलर आहे. भारतीय चलनात ही रक्कम 3,14,322 रुपये होते. या यादीत सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहराच्या मध्यभागी एका बेडरूमासाठी 3,454 डॉलर मासिक भाडे द्यावा लागते.

भाड्याच्या बाबतीत जगातील टॉप 10 सर्वात महागड्या शहरांपैकी सात अमेरिकेतील आहेत. न्यूयॉर्क व्यतिरिक्त, यामध्ये सॅन फ्रान्सिस्को, ब्रुकलिन, बोस्टन, सॅन दिएगो, मियामी आणि सॅन जोस यांचा समावेश आहे. याशिवाय बर्म्युडाच्या हॅमिल्टन आणि जर्मनीच्या झुरिच यांचा पहिल्या दहामध्ये समावेश होतो.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या मते, जगातील 13 शहरांमध्ये एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे मासिक भाडे 2,500 डॉलरपेक्षा जास्त आहे.

यामध्ये जॉर्जटाउन, लॉस एंजेलिस आणि लंडनचा समावेश आहे. लंडनच्या शहराच्या मध्यभागी एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे मासिक भाडे 2,614 डॉलर आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 2,16,848 रुपये आहे.

Most Expensive City
MCLR Hike: RBI च्या रेपो दरात बदल नाही, मग का होत आहेत कर्जे महाग, काय आहे कारण?

हाँगकाँगमध्ये 2,274 डॉलर, डब्लिनमध्ये 2,121 डॉलर, सिडनीमध्ये 2,114 डॉलर, दुबईमध्ये 1,976 डॉलर, पॅरिसमध्ये 1,411 डॉलर, टोकियोमध्ये 974 डॉलर आणि शांघायमध्ये 930 डॉलर आहे.

Most Expensive City
Billionaires List: अदानी आणि पुतिनसाठी खुशखबर! अब्जाधीशांच्या यादीत मिळाले स्थान, अंबानींची स्थिती काय?

दिल्ली-मुंबईची काय स्थिती आहे?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे मासिक भाडे 570 डॉलर (रु. 47,285) आहे. भाड्याच्या बाबतीत मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर आहे, तर जगात मुंबई 351 व्या क्रमांकावर आहे.

दिल्लीतील एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे भाडे मुंबईच्या निम्म्याहून कमी आहे. दिल्लीमध्ये एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे मासिक भाडे 245 डॉलर आहे म्हणजे 20,324 रुपये.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि बांगलादेशातील ढाका येथे मासिक भाडे सर्वात कमी आहे. इस्लामाबादमध्ये ते 152 डॉलर आणि ढाकामध्ये 135 डॉलर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.