मुलांच्या आर्थिक सजगतेत आईची भूमिका

दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त समाजात महिलांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. यामध्ये एक आई म्हणून तिची भूमिका सर्व भूमिकांपेक्षा महत्त्वाची मानली जाते.
mother role in children financial awareness
mother role in children financial awarenessSakal
Updated on

नंदिनी वैद्य

दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त समाजात महिलांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. यामध्ये एक आई म्हणून तिची भूमिका सर्व भूमिकांपेक्षा महत्त्वाची मानली जाते.

आईचे प्रथम कर्तव्य आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून एक उत्तम व्यक्ती घडविणे हे आहे. मुलांवर सर्व इतर संस्कार करत असताना दुर्लक्षित होणारा महत्त्वाचा संस्कार म्हणजे ‘आर्थिक संस्कार’ वा ‘आर्थिक सजगता’.

आर्थिक सजगता म्हणजे फक्त कमाई इतकेच नसून, आर्थिक शिस्त, व्यवस्थापन ही समज निर्माण करणे. मुलांवर आर्थिक संस्कार करावयाचे असतील, तर सर्वांत सोपा उपाय म्हणजे आईने स्वतःवर आधी हे संस्कार केले पाहिजेत.

मुलांमध्ये आर्थिक सजगता आणावयाची असेल, तर सर्वप्रथम त्यांना काटकसरीने कसे जगावे हे शिकवावे लागेल. भविष्यात उत्पन्न किती असेल, काय असेल हे निश्चितपणे सांगता येईलच असे नाही, मात्र होणारे खर्च नियंत्रणात ठेवता येणे शक्य असते.

मुले थोडी मोठी झाली, की एखादी वस्तू नीटनेटकेपणाने कशी वापरता येऊ शकेल, ती दीर्घकाळ कशी टिकेल आणि त्यामुळे वाचलेल्या पैशातून एखादी अधिक चांगली वस्तू घेता येईल, याचे भान त्यांनी आणून द्यावे लागेल.

शालेय वयात वर्गातील मुलाने एखादी वस्तू घेतली, मग मलाही ती हवी अशी एक भावना असते, अशावेळी आईने मुलाला हे समजावून देणे इष्ट असते, की त्याची व आपली आर्थिक स्थिती यात फरक असू शकतो, त्यामुळे आपल्याला ती वस्तू परवडू शकत नाही.

त्यातूनही आर्थिक परिस्थिती उत्तम असली, तरी मूल मागत असलेली वस्तू खरोखरच आवश्यक आहे का, याचा विचार आईने मुलास करावयास शिकवणे गरजेचे आहे. भविष्यात ‘आॅपॉर्च्युनिटी कॉस्ट’ या संज्ञेचा अभ्यास येथेच अगदी नैसर्गिकपणे मुलांमध्ये रुजवला जाऊ शकतो.

आता फारशी गरज नसताना एखादी वस्तू केवळ हवी म्हणून घेतली जाईल, अशावेळी एखादी दुसरी उत्तम वस्तू घेण्याची संधी जाईल, याची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे आहे.

किशोरवयातील मुलांसाठी पुढील ७-८ वर्षे ही कारकीर्द ठरविण्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. याच वयात आईने मुलांना आपण करत असलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती देणे, काही आर्थिक कामे मुलांवर सोपवणे हे करायला हरकत नाही. गुंतवणुकींचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या बदलणाऱ्या वयोगटानुसार त्यांचे प्रमाण कसे किती ठेवावे हे नियमित मुलाला सांगता आले, तर आर्थिक संस्कार सहज होऊ शकतील.

हे सर्व आपल्याकडून एक जबाबदार आई म्हणून होऊ शकले, तर पुढे जेव्हा आपला मुलगा व मुलगी कमाई करण्याच्या दिशेने वाटचाल करतील तेव्हा आर्थिक सजगता असल्याने ते आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने परिपक्व असतील आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्यांचे भविष्य सुरक्षित असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.